पुणे

पुण्यातल्या कोविडच्या अभ्यासासाठी सरसावली जगभरातील शास्त्रज्ञांची फाैज

संभाजी पाटील

पुणे : जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या चाळीस पुणेकर युवा शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन कोविड विषयक संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन आणि अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या माध्यमातून हा गट पुणेकरांवरील कोविडच्या परिणामांचा अभ्यास करणार आहे. 

९ मार्च रोजी पुण्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला. एक कोटी लोकसंख्या असलेल्या पुणे जिल्ह्यात आजवर ३.५  लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. अपुऱ्या जागेत दाटीवाटीने राहणारी मोठी लोकसंख्या, स्वच्छतेची समस्या यामुळे पुणे शहरात रूग्णांची संख्या वाढली. परंतु, या परिस्थितीतही पुण्यातील मृत्युदर २ टक्क्यांपर्यंत आटोक्यात राहू शकला. आता मात्र सर्वत्र कोविडचे गांभीर्य कमी होताना दिसत आहे. गणेशोत्सव, दिवाळीत रस्त्यांवर झालेली गर्दी आणि पुणेकरांनी उडवलेला सामाजिक अंतराचा फज्जा त्यामुळे रूग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. 

याच पार्श्वभूमीवर हा गट पुणेकरांमधील कोविड परिस्थिती बद्दलची जागरूकता, सवयी, आणि त्यांच्यावर कोविडचे झालेले आरोग्य विषयक आणि आर्थिक परिणाम अभ्यासणार आहे. तसेच, “सामुदायिक शहाणपण” या मानसशास्त्रातील तंत्राचा वापर करून परिस्थिती बद्दलचे अंदाज वर्तवणार आहेत. या सर्वेक्षणाचा विशेष भर हा नागरी वस्त्यांवर असून त्यासाठी ज्ञान प्रबोधिनी, स्व-रूपवर्धिनी, सेवा सहयोग अशा १५ विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगातून हा प्रकल्प राबविला जात आहे. हा सर्वे मराठी आणि इंग्रजी भाषांमधून भरता येतो. त्यासाठी केवळ १०-१२ मिनिटे लागतात.

कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी डेटाच्या आधारे स्मार्ट नियोजन करणे हे सद्य काळात कळीचे ठरते आहे. म्हणून या संशोधनाचे निष्कर्ष पॉलिसी रिपोर्टच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडले जाणार आहेत. तसेच, स्मार्ट सिटी योजनेशी जोडून घेऊन हे युवक पुणे शहरासाठी स्मार्ट इंटरॅक्टिव नकाशे बनवणार आहेत. यामध्ये वॉर्डनिहाय निष्कर्ष देखील बघता येतील. विशेष म्हणजे, हे नकाशे पुणे स्मार्ट सिटीच्या डेटा स्टोअर वर उपलब्ध असलेल्या इतर डेटा सेट सोबत सहजपणे जोडले जातील. यातून प्रशासनाची निर्णय प्रक्रिया सोपी आणि अचूक होण्यास मोठी मदत मिळू शकेल.

“आयआयटी, अजीम प्रेमजी, कॅलटेक, परडयू, जॉन्स हॉपकीन्स अशा विविध अग्रगण्य विद्यापीठांमधील विद्यार्थी पुण्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी मशीन लर्निंग, मानसशास्त्र, संख्याशास्त्र, तंत्रज्ञान, डेटा सायन्स अशा विविध शाखांचा एकत्र वापर करून आम्ही हा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. पुण्यामधील आणि विशेषतः नागरी वस्त्यांमधील नियोजनासाठी प्रशासनाला मदत व्हावी हा आमचा मुख्य हेतू आहे. तसेच, आम्ही गोळा केलेली माहिती सर्व पुणेकरांपर्यंत पारदर्शकतेने पोचावी यासाठी पुणे डेटा स्टोअरच्या माध्यमातून नि:शुल्क खुली केली जाणार आहे. मोठ्या संख्येने पुणेकरांनी या सर्वेक्षणात सहभागी व्हावे,” असे आवाहन ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशनच्या वतीने प्रकल्प प्रमुख अभिषेक देढे यांनी केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील लिंक वर जाऊन सर्वे भरता येईल - bit.ly/PuneCOVID
- सर्वेसाठी १० ते १२ मिनिटे लागतात.
- प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत मदत होईल. 
- वॉर्डनिहाय स्मार्ट इंटरॅक्टिव नकाशे बनवणार. 
- पुणे स्मार्ट सिटी योजनेशी जोडून घेता येणार.     
- मोबाईलवर क्युआर कोड स्कॅन करून सर्वे भरू शकता.  

प्रकल्प प्रतिनिधी: आकाश चौकसे +1-317-560-6098 (अमेरिका) आणि नचिकेत पानसे +91-83088 23320 (पुणे)
संपर्क: survey@jnanaprabodhinifoundation.org

टीप : सविस्तर माहितीसाठी पाहा गुरूवार (ता. 26 चा) सकाळचा अंक.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT