Galaxy Sakal
पुणे

इतिहास उलगडणाऱ्या आकाशगंगेचा शोध घेण्यात पुण्याच्या शास्रज्ञांना यश

अवकाशात शोधलेला प्रत्येक ग्रह, तारा, कृष्णविवर एवढंच काय तर दीर्घिकाही विश्वाच्या निर्मितीबद्दल काही ना काही सांगत असते. अवकाशीय घटक जेवढा जुना, तेवढी माहिती जास्त.

सम्राट कदम

अवकाशात शोधलेला प्रत्येक ग्रह, तारा, कृष्णविवर एवढंच काय तर दीर्घिकाही विश्वाच्या निर्मितीबद्दल काही ना काही सांगत असते. अवकाशीय घटक जेवढा जुना, तेवढी माहिती जास्त.

पुणे - अवकाशात शोधलेला प्रत्येक ग्रह, तारा, कृष्णविवर एवढंच काय तर दीर्घिकाही विश्वाच्या निर्मितीबद्दल काही ना काही सांगत असते. अवकाशीय घटक जेवढा जुना, तेवढी माहिती जास्त. भारतीय शास्रज्ञांनी अशी एक दीर्घिका शोधली आहे, ज्यामुळे दीर्घिकांच्या निर्मितीची सर्वात जास्त माहिती अर्थात इतिहास मानवाच्या हाती लागणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील शास्रज्ञांच्या या संशोधनाने देशाची मान उंचावली आहे.

काय आहे संशोधन?

सुमारे २६ कोटी वर्षे वयाची आणि तब्बल १२ लाख प्रकाशवर्षे पसरलेली एक अवाढव्य रेडिओ दीर्घिका शास्रज्ञांनी शोधली आहे. एबेल ९८० या दीर्घिकांच्या समूहात ही दीर्घिका स्थित आहे. या दीर्घिकेच्या दोन्ही बाजूला रेडिओ स्रोताची ‘पाळे’ (लोब) आहेत. जीवाश्म पाळे (लोब) म्हणून ओळखली जाणारी ही अवशेषीय दीर्घिका कमी वारंवारीतेच्या रेडिओ लहरी उत्सर्जित करते.

संशोधन महत्त्वाचे का?

प्रथमच एवढी जुनी अवशेषीय रेडिओ दीर्घिका शोधण्यात यश आले आहे. जसे प्राणी, वनस्पती आणि स्थलीय घटनांच्या जीवाश्म नोंदी आहेत, तसे रेडिओ आकाशगंगेचे अवशेष किंवा जीवाश्म लोब विश्वाच्या पूर्वीच्या काळात असलेल्या परिस्थितीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती उघड करते.

संशोधन आव्हानात्मक का होते?

जीवाश्म रेडिओ लोब हे झपाट्याने फिकट होत जातात त्यामुळे त्यांना शोधणे दुरापास्त होते. मात्र दीर्घिका जर समुहा सोबत असेल तर तर फिकट होण्याचे प्रमाण कमी होते. क्ष-किरण दुर्बिणीने तो शोधता येतो. कमी वारंवारीतेच्या रेडिओ लहरी शोधणे जगातील सर्वच दुर्बिणींना शक्य नाही. पण नारायणगांव जवळील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपमुळे हे संशोधन शक्य झाले आहे. तसेच व्हेरी लार्ज

अ‍ॅरे, लो-फ्रिक्वेंसी अ‍ॅरे आणि चंद्रा एक्स-रे वेधशाळेचाही संशोधनात सहभाग.

संशोधनाचा फायदा काय?

सर्वात जुनी अवशेषीय दीर्घिका असल्यामुळे तेंव्हाच्या विश्वाची सर्वाधिक माहिती या दीर्घिकेत आहे. त्यामुळे दीर्घिका एवढंच काय दीर्घिका समुहाच्या निर्मितीचे रहस्य याद्वारे उलगडण्यास मदत होणार

कोणी लावला शोध?

विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. सुरजित पॉल, पीएच.डी.चे विद्यार्थी समीर साळुंखे, इटलीतील आयएनएएफ पाडोवा खगोलशास्त्र वेधशाळेचे डॉ. सतीश सोनकांबळे आणि शुभम भगत, इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे प्रा. गोपाल कृष्ण यांचा संशोधनात सहभाग. ‘ॲस्ट्रॉनॉमि अँड ॲस्ट्रोफिजिक्स या शोधपत्रिकेत प्रकाशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

MCA Election: शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत!

Royal Enfield New Bike : रॉयल एनफील्डची 'हिमालयन माना ब्लॅक एडिशन' लाँच; EICMA 2025 दिसली खास झलक, पाहा जबरदस्त फीचर्स अन् किंमत

फडणवीसांच्या खात्यावर पैसेच नसतात, आमदार म्हणून मिळतात ते कुठे जातात माहिती नाही : अमृता फडणवीस

SCROLL FOR NEXT