Section 144 In Pune Esakal
पुणे

Section 144 In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात १४४ कलम लागू, काय आहे कारण?

Section 144 In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Section 144 In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुणे शहरात कायदे, नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत शहरात कलम १४४ लागू राहणार आहे.

पुणे पोलीस प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आले आहे. शहरात १४४ कलम लागू केल्यानंतर आता शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची बैठक झाली आहे.

पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरातील कायदे, न्यायालयीन आदेशांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत शहरात कलम १४४ लागू असणार आहे.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बार, पब्स रात्री दीड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानुसार पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट मालक आणि चालकांना कलम १४४ अंतर्गत आदेश दिले आहेत.

हुक्का पार्लर बंद

पुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT