पुणे

पाटस टोलनाक्यावरील सुरक्षा रक्षक गावठी कट्टा, तलवारीसह जेरबंद

या घटनेमुळे पाटस टोलनाक्यावरील सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

जनार्दन दांडगे

पुणे ः जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाक्यावरील एका सुरक्षा रक्षकास गावठी कट्टा व तलवारीसह शुक्रवारी (ता. १६) मध्यरात्री जेरबंद केले आहे. धनाजी मारुती माकर (वय ४४ वर्षे, रा. पडवी, गायकवाड वस्ती, ता. दौंड) हे त्या जेरबंद केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पाटस टोलनाक्यावरील सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस टोलनाक्यावरील सुरक्षा रक्षक गावठी कट्टा व तलवारीसह संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोलिस नाईक गुरु गायकवाड, मुकुंद कदम यांनी पाटस टोलनाका परिसरात शुक्रवारी रात्री सापळा रचला होता.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धनाजी माकर हा बुलेटवरुन टोलनाक्यावर आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी धनाजीकडे अधिक चौकशी केली असता, धनाजीकडे १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ बुलेट मोटरसायकल व मोबाइल असा १,७०,४००/- (एक लाख सत्तर हजार चारशे रुपयांचा) मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत.

सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात...

पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका सुरु झाल्यापासूनच, टोलनाक्यावर वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, सुरक्षा यंत्रणा व वाहन चालकांमध्ये होणारी भांडणे, सुरक्षा रक्षकांकडून दादागिरी ही बाब नित्याचीच बनलेली आहे. यापूर्वीही या टोलनाक्यावर अनेक वेळा सुरक्षा रक्षकांकडून अनेक प्रवाशांना मारहाण केल्याचे गुन्हे यवत पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मात्र, सुरक्षा रक्षकाकडे थेट गावठी कट्टा व तलवारच सापडल्याने पाटस टोलनाक्यावरील सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पालघरमध्ये कलर कंपनीला भीषण आग; केमिकलच्या भडक्याने आगीचा लोट

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT