Crime 
पुणे

सुरक्षारक्षकाने बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने केली अनेकांची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रधानमंत्री धुणे भांडी कामगार योजना असून त्यात काही रक्कम गुंतविल्यास १५ दिवसात मोठ्या प्रमाणात बिनव्याजी कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून सुरक्षारक्षकाने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरक्षारक्षकासह त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिरालाल मधुकर आगज्ञान (वय ४०) आणि सपना हिरालाल आगज्ञान (वय ३०, दोघे रा. अष्टविनायकनगर, आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या करणी महेश माधव मंडावले (वय ५०, रा. अष्टविनायकनगर, आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपी जोडप्याने मिळून हा प्रकार केला आहे. ते सांगत असलेली योजना खरी वाटावी म्हणून त्यांनी बनावट फॉर्म देखील तयार केला आहे.

साखळी पद्धतीने राबविली फसवणुकीची योजना -
पत्नीच्या व मी प्रधानमंत्री धुणे भांडी कामगार योजनेचे सरकारमान्य पद्धतीने काम पाहतो. या योजनेतून गरीब व मजुरांनी काही रक्कम गुंतवली की त्यांना भरमसाट बिनव्याजाने १५ दिवसात कर्ज मंजूर करून देतो. तुम्ही आमचे सभासद होऊन कर्ज घेतले आणि तुम्ही आणखी दोन जणांना आमच्याकडे कर्ज घेण्यासाठी आणल्यास तुम्हाला घेतलेल्या कर्जाचा एक हप्ता माफ होणार आहे, अशी साखळी पद्धतीने आम्ही योजना राबवत असल्याचे त्याने लोकांना सांगितले.

अशी उकळली रक्कम -
योजनेत सहभागी होण्यासाठी तो फॉर्मचे प्रत्येकी ३०० रुपये घेत. तो फॉर्म भरून घेतल्यावर आमच्याकडे १५ हजार रुपये गुंतविले तर तुम्हाला १५ लाख रुपयांचे कर्ज मिळेल, असे आमिष त्याने दाखविले. त्यानुसार काहींनी १५ हजार रुपये तर काहींनी १० हजार रुपये गुंतविले. नोव्हेबर २०२० पासून हा प्रकार सुरु झाला होता. पैसे गुंतवूनही कर्ज मिळत नसल्याने लोकांना पोलिसांकडे धाव घेतली.

आरोपी व त्याच्या पतीपत्नीने आतापर्यंत १३ जणांना तीन लाख ३२ हजार ३०० रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे. त्यांनी आणखी काही जणांना फसविले असल्याची शक्यता आहे. दोघांना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.
- वैभव गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT