Security guards in the Pune  market yard without masks
Security guards in the Pune market yard without masks 
पुणे

मार्केट यार्डात सुरक्षा रक्षकच विनामास्क; वाढत्या कोरोनाचे गांभीर्यच नाही

प्रविण डोके

मार्केट यार्ड : शहरात गुलटेकडी मार्केट यार्ड हे सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण आहे. या ठिकाणी दररोज हजारो लोकांची ये जा असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे याठिकाणी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. परंतु बाजार समिती, व्यापारी, ग्राहक यांच्याकडून बाजार आवारात कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बाजार समितीच्या गेटवर आणि आवारात अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत. मात्र सुरक्षा रक्षकच विनामास्क फिरत असल्याचे आढळून येत आहे. तसेच बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या शेतमालाच्या गाड्या यांच्याकडून पावती घेण्यासाठी प्रत्येक गेटवर कर्मचारी उभे असतात. मात्र यातील अनेक कर्मचारी विनामास्क दिसून येत आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती हलगर्जीपणा दिसून येत आहे. एकीकडे प्रशासकीय पातळीवर बैठका घेऊन फैलाव थांबवण्यासाठी शहरात अनेक निर्बंध लावण्यात आहेत. दुसरीकडे मात्र बाजार समिती प्रशासन, व्यापारी, कामगार ग्राहक यांना कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, बाजार आवारात येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर, प्रत्येकाला सॅनिटाटझरचा वापर केला जात आहे. तसेच बाजार आवारात जागोजागी सूचना फलक लावले आहेत. व्यापारी, कामगारांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. परंतु प्रशासकांनी केलेला हा दावा प्रत्यक्षात मात्र फोल असल्याचे दिसून येत आहे. तसेच समितीने नियमावली जाहीर केली असली त्यावर कोणीही अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. भाजीपाला, फळ, कांदा बटाटा, केळी, फुल, भुसार बाजारात सर्वत्र सारखीच परिस्थिती दिसून येत आहे.

बाजारात फिरताना अनेक लोक मास्क वापरत नाहीत. अनेकांच्या तोंडला अर्धवट मास्क लावलेले असते. गेटवर सॅनिटाटझरचा वापर केला जात नाही. ग्राहकांचे तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर केला जात नाही. त्यामुळे करोना बाबत सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत असून बाजार समितीसह आरोग्य प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरात सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण

मार्केटमध्ये दररोज दररोज साधारणतः नागरिक, अडते, व्यापारी, किरकोळ खरेदीदार, कामगार यांची बाजारात येण्याची संख्या मोठी आहे. बाजारात दररोज २० ते २५ हजार लोकांची ये जा असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT