Pune-Municipal
Pune-Municipal 
पुणे

#PMCIssue कचऱ्याची दुर्गंधी घालविण्यासाठी महापालिका काय करते पहा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांच्या सीमेवर पाय ठेवताच तुमचा श्‍वास रोखला जातो, तो इथल्या कचरा डेपोतल्या कचऱ्याच्या दुर्गंधीने. ही दुर्गंधी घालविण्यासाठी महापालिका कचऱ्यावर रोज सुगंधी औषधांची फवारणी करीत आहे. यासाठी चालू वर्षात ५६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

कचरा डेपोतून येणाऱ्या दुर्गंधीने गावकऱ्यांना नकोसे झाल्याने फवारणी नेमकी औषधाची की पैशांची, हा चर्चेचा विषय ठरत आहे.

कचऱ्यावर औषध फवारणीसाठी एवढा खर्च होत नाही, अशी कबुली देत डेपोच्या आवारातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले आहे. त्यामुळे कचऱ्यावर औषध फवारणीच्या नावाखाली पैशांचा अपहार होत असल्याची शंका उपस्थित होत आहे. येथील डेपोच्या १६३ एकर जागेपैकी केवळ ४० एकर जागेत कचरा टाकला जातो. या जागेत रोज आठशे ते एक हजार टन कचरा टाकण्यात येतो.

ओला आणि सुका कचरा असल्याने दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे डेपोतील कर्मचाऱ्यांसह उरुळी देवाची, फुरसुंगी गावांतील लोक हैराण झाले आहेत. त्यावर उपाययोजना होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यानंतर औषधफवारणी करून दुर्गंधी कमी करण्याची योजना आखण्यात आली, त्यासाठी ठेकेदार नेमला. मात्र, दुर्गंधीऐवजी लाखो रुपयांची विल्हेवाट लावली जात असल्याची वस्तुस्थिती आहे. 

कचऱ्याच्या वाहनांसाठी लाखोंची सफाई 
डेपोत औषधफवारणी करतानाच कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधूनही दुर्गंधी येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. ही वाहनेही चकाचक राहावीत, यासाठी ती धुण्याची योजना राबविण्याची शक्कलही महापालिकेने लढविली आहे. ही वाहने धुण्यासाठी वर्षभरात ६३ लाख रुपये दिले आहेत. अशाच प्रकारे गेली पाच-सहा वर्षे याची बिनबोभाट बिले काढण्यात येत आहेत. 

कचऱ्यावर फवारणीसाठी खर्च (रुपयांमध्ये) 
२०१५-१६  -  २६ लाख ५२ हजार 
२०१६-१७  -  ३८ लाख ३७ हजार 
२०१७-१८  -  ५ लाख ३१ हजार 
२०१८-१९  -  ४१ लाख ४० हजार 
२०१९-२०  -  ५६ लाख 

डेपोत खूप वर्षांपासून कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी येत आहे. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवू नये, यासाठी खबरदारी म्हणून औषधफवारणी केली जाते. या कामावर पालिकेचे नियंत्रण आहे. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT