Tiger 
पुणे

पर्यावरण रक्षणासाठी या गावाने काय केले पहा

सकाळवृत्तसेवा

पुणे - नागझिरा अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पांत पर्यटक प्लॅस्टिकचा कचरा फेकत आहेत. त्यामुळे निसर्गाची हानी होत आहे. प्लॅस्टिक अविघटनशील असल्यामुळे ते पर्यावरणाला हानिकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर प्लॅस्टिकचा कचरा गोळा करण्याचे विधायक पाऊल पिटेझरी  (जि. भंडारा) गावाने उचलले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे म्हणाले, ‘पिटेझरे जंगलाच्या परिसरात गेल्या तीन रविवारपासून प्लॅस्टिक कचरा गोळा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी उपक्रमात भाग घेतला. त्यांनी प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, प्लॅस्टिक कापडाचे तुकडे, काचेच्या बाटल्या, पत्रा, बूट, चपला, रबर, कोल्ड ड्रिंक कॅन गोळा केले. नागझिरा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांनी, ग्रामस्थांनीही हा कचरा जंगलात टाकून दिला होता.

पावसाळ्यापूर्वी हा उपक्रम राबविला.’ सर्व कचरा साकोली गावात दिला. तेथील नगर परिषदेचे कर्मचारी रामगोपाल सोनवणे यांनी कचरा संकलन आणि वर्गीकरण केंद्रात कचरा ठेवून घेतला. उपक्रमात करण उईके, प्रज्वल भलावी, जयेश  टेकाम, भागेश्वर टेकाम, भूपेश टेकाम व अमीर भलावी यांनी भरीव मदत केली, असे पुरंदरे यांनी सांगितले.

उपक्रमाबाबत...

  • सलग तीन रविवार राबविला
  • एकूण ६८ पोती कचरा गोळा 
  • कचऱ्याचे विलगीकरण
  • रस्त्यासाठी प्लॅस्टिक कचऱ्याचा वापर 
  • शाळेतील विद्यार्थ्यांचाही सहभाग

प्राणी, कीटक पुन्हा निसर्गात 
उपक्रमादरम्यान ढालकीटक, गांडूळ, गोम, पाली, सरडे, मुकी मांडवल, साप, विंचू, उंदीर आणि चिचुंदरी आढळली. मुलांना प्रत्येक प्राणी दाखवून आणि त्याची माहिती देऊन त्यांना निसर्गात सोडले.

दोन मोठ्या पोत्यात गावकरी घरातील सर्व कचरा गोळा करून ठेवतील. त्यामुळे आता कचरा जंगलात पडणार नाही.
- किरण पुरंदरे, निसर्ग अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Mandatory: ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार; पण जबरदस्ती करणार नाही, भाषा नियमावर देवेंद्र फडणविसांची मोठी घोषणा

Shriram Finance चा 3 लाख कोटींचा टप्पा पार! चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी; गुंतवणूकदारांना 300% Dividend जाहीर

नवी मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! आता MRI टेस्टसाठी हजारोंचा खर्च टळणार; वाशी मनपा रुग्णालयात स्वस्त सुविधा सुरू होणार

KCR कुटुंबात राजकीय भूकंप! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीकडून नव्या पक्षाची घोषणा; निलंबनानंतर मोठा निर्णय, भावाची चिंता वाढली

Nagpur Accident : नागपूरमध्ये ‘हिट ॲण्ड रन’, ७२ वर्षीय योग शिक्षिकेला कारने चिरडले

SCROLL FOR NEXT