पुणे

पुण्यात वरात काढण्याची हौस वर पित्याच्या आली अंगलट

रवींद्र पाटे

नारायणगाव : मुलाच्या विवाहप्रसंगी बेकायदेशीर डीजे वाद्य वाजवून, सोशल डिस्टन्सचे पालन न करता वरात काढल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी डीजे वाहन मालक, चालक व कार्यमालक आशा तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुमारे चौदा लाख रुपये किंमतीचे डीजे वाहन  पोलिसांनी जप्त केले आहे.या मुळे मुलाच्या विवाह प्रसंगी डीजे वाद्य वाजवुन वरात काढण्याची हौस पारगाव (ता. जुन्नर) येथील वर पित्याच्या चांगलीच अंगलट आली आहे.

या प्रकरणी डिजे मालक निलेश बाळासाहेब शिंदे( राहणार वळती,ता.आंबेगाव जि पुणे 2) आषिश संदीप डोके( राहणार महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव) व  कार्यमालक  पुंजाराम दाजीबा अडागळे( राहणार पारगाव,ता.जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के.गुंड यांनी दिली.

पारगाव येथील कावळ पिंपरी गावात विवाह समारंभ निमित्त ९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोठया आवाजात डिजे वाद्य  वाजवून सोशल  डिस्टन्सचे उल्लंघन करून सुमारे सत्तर तरुण गाण्याच्या तालावर नाचत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती.त्या नुसार सहायक पोलिस निरीक्षक गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी गेले असता  कावळ पिंपरी रोडवर रस्त्याचे कडेला  मोठया आवाजात कर्कष आवाजात डीजेच्या तालावर विनामास्क ,सोशल  डिस्टन्स न राखता सुमारे सत्तर तरुण नाचत असल्याचे दिसून आले.

चौकशी केली असता अडागळे यांनी विवाह समारंभासाठी पोलीस परवानगी घेतली होती. मात्र  परवानगीत दिलेल्या अटींचे पालन केले नसल्याचे आढळून आले.या वरून पोलिसांनी डीजे वाहन मालक ,चालक व कार्यमालक आशा तीन जणांवर गुन्हा दाखल केला.तसेच चौदा लाख रूपये किमतीचे वाहन व डीजे साहित्य जप्त केले.पोलीस अधिक्षक  डाॅ.अभिनव देषमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुंड यांनी ही कारवाई केली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT