iiser research center Scientist 
पुणे

पुण्यातील ‘आयसर’च्या शास्त्रज्ञांची फेलो म्हणून निवड

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) तीन शास्त्रज्ञांची भारतीय विज्ञान अकादमीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. जीवशास्त्राचे प्रा. अंजन बॅनर्जी आणि डॉ. थॉमस पुकाडील, भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. सीमा शर्मा यांना ही फेलोशिप प्राप्त झाली आहे. तसेच प्रा. बॅनर्जी यांची राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे फेलो म्हणूनही निवड झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशोधनाचा प्रमुख भाग -
प्रा. बॅनर्जी -
प्रामुख्याने बटाट्याशी निगडित संशोधनामध्ये कार्यरत प्रा. बॅनर्जी यांच्या प्रयोगशाळेत बटाट्याच्या वाढीमध्ये भूमिका बजावणाऱ्या जैविक रेणूंच्या नियंत्रणासंबंधी संशोधन चालू आहे. आधुनिक जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र आदींच्या साहाय्याने हे संशोधन होते.

डॉ. शर्मा - विश्‍वाच्या मूलभूत रचना समजून घेण्यासाठी डॉ. शर्मा यांची प्रयोगशाळा मूलभूत कणांवर संशोधन करते. प्रोटॉन-प्रोटॉन धडकेचा अभ्यास या प्रयोगशाळेत होतो. नव्या मूलभूत कण आणि त्यांच्यातील अभिक्रिये संदर्भातील सैद्धांतिक मांडणी अर्थात सुपरसीमेट्रीसंबंधीचे संशोधन, कॉस्मिक ऑब्झर्वेशन संबंधीचे संशोधन.

डॉ. पुकाडील - पेशीद्रव्यातील मेंम्बरेनच्या विभाजनासंबंधीचे संशोधन डॉ. पुकाडील यांच्या प्रयोगशाळेत चालते. पेशीमध्ये विविध क्रियांसाठी मेंम्ब्रेनची निर्मिती होते. या मेंम्ब्रेनसंबंधीच्या प्रथिनांच्या संशोधनात ही प्रयोगशाळा कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.

फेलो म्हणजे काय?
संबंधित संस्थेचे मानद सदस्यत्व म्हणजे फेलो. त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून ही निवड करण्यात येते. प्रामुख्याने वर्षभरासाठी ही निवड झालेली असते. देशातील विज्ञान क्षेत्रातील नावाजलेली संस्था असलेल्या भारतीय विज्ञान अकादमीची बंगळूर येथे १९३४मध्ये तर १९३०मध्ये राष्ट्रीय विज्ञान अकादमीची स्थापना झाली होती. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव; प्रतितास १२० किमी वेगमर्यादा, ४२ हजार कोटींचा खर्च

Western Railway: पश्चिम रेल्वेवर फुकटे प्रवासी वाढले! सात महिन्यांत १२१.६७ कोटी दंड

Delhi IGI Airport: एयरपोर्टवर १५ तासांचा तांत्रिक अडथळा, विमान वाहतूक पुन्हा सुरळीत

Latest Marathi Breaking News Live: राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचं बक्षिस, बच्चू कडू

Nashik Crime : सावकाराच्या बायकोने पोलिसांना धमकावले; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT