पुणे

पुणे : चेतन तुपेंचे राष्ट्रवादीतील 'हे' पद आता जाणार?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणुकीत चकमकदार कामगिरी केलेल्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पुन्हा संघटनात्मक फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. संघटनात्मक कामगिरी उंचाविल्यानंतर आमदार चेतन तुपे यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे केले जाण्याचे संकेत पक्षाचे नेते अजित पवार यांनीच दिले आहेत. आमदार म्हणून मतदारसंघात पूर्णवेळ कामे करण्याकरिता तुपे यांना बदलून नवा शहराध्यक्ष नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीचा कारभारी कोण? याची उत्सुकता पक्ष संघटनेत आहे. 

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पुणे शहर राष्ट्रवादीत बदल करण्याच्या हालचाली पक्षनेतृत्वाने केल्याचे सांगण्यात येत आहे. शहराध्यक्षांसह आणखी काही पदे बदलण्याचा अंदाज अजित पवार यांनी मांडताच नव्या पदांसाठी इच्छुकांनी "लॉबिंग'ही करण्यास सुरवात केली आहे. 
खासदार वंदना चव्हाण यांच्यानंतर पावणेदोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद महापालिकेतील तेव्हाचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्याकडे आले. त्यानंतर काही निवडणुका तोंडावर असल्याने तुपे यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत, सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविला. आपल्या दिमतीला "जॅम्बो' कार्यकरिणी घेत, तुपे यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले. 

विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचे कारण देत, तुपे यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीपासून लांब ठेवण्यात आले. तेव्हा तुपेंच्या जागी दिलीप बराटे यांची वर्णी लागली. त्यामुळे तुपे नाराज झाल्याची चर्चा पक्ष वर्तुळात होती. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तुपेंना हडपसरची उमेदवारी मिळाली आणि ते आमदारही झाले. या निवडणुकीत तुपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याने संघटनेत उत्साह आहे. 

नव्या आमदारांना मूळ जबाबदारी नेटाने पार पाडता यावी, यासाठी त्यांच्याकडील अतिरिक्त पदे काढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. त्याचा हवाला देत पुढच्या काही दिवसांत संघटनेत बदल करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षाची ताकद लक्षात घेऊन आता काही इच्छुकांनी शहराध्यक्ष होण्यासाठी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. 

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेताही ठरल्याप्रमाणे बदलला जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितल्याने राष्ट्रवादीला नवा शहराध्यक्ष आणि महापालिकेत नवा विरोधी पक्षनेता राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT