Death_Senior_Citizen
Death_Senior_Citizen 
पुणे

पुण्यातील खासगी रुग्णांलयांची मनमानी; ज्येष्ठ नागरिकाला गमवावा लागला जीव!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील सहा नामांकित खासगी रुग्णालयांनी कोरोनाचा इतका धसका घेतला आहे की, हृदयविकाराचा झटका आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दाखल करूनही घेतले नाही. त्यामुळे दोन तासांत अखेर ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्या नागरिकाचा मृत्यू झाला. पैसे भरण्याची तयारी असूनही खासगी रुग्णालयांनी केलेल्या टोलवाटोलवीमुळे त्या ज्येष्ठाचे नातेवाईक आता सुन्न झाले आहेत.  

वडगाव शेरीमध्ये राहणारे तानाजी नामदेव दुधाने (वय 68) यांच्याबाबत हा गंभीर प्रसंग घडला आहे. ४ जुलै रोजी पहाटे तीन ते सकाळी सहा दरम्यान हृदयविकाराचा झटका आलेला असताना, त्यांना शहरातील एकाही रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. अखेर ससूनमध्ये त्यांना बेड उपलब्ध झाला. पण, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

दुधाने यांना चार जुलै रोजी पहाटे पावणे तीन वाजता राहत्या घरातच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना अस्वस्थही वाटत होते. त्यांच्या मुलांनी त्यांना तातडीने तीन वाजता कोरेगाव पार्कमधील एका प्रख्यात रुग्णालयात नेले. त्यावेळीही दुधाने स्वतः चालू शकत होते. तेथे त्यांची तपासणी झाली. त्यात त्यांच्या रक्तातातील साखरेचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसून आले. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु, आयसीयुमध्ये बेड उपलब्ध नाही, असे त्यांना सांगण्यात आले.

दुधाने यांच्या नातेवाईकांनी त्यांना बंडगार्डन रस्त्यावरील प्रख्यात रुग्णालयात नेले. तेथेही जागा उपलब्ध नाही, असेच सांगण्यात आले. त्या रुग्णालयाच्या समोर असलेल्या रुग्णालयातूनही त्यांना तसेच सांगण्यात आले. रास्ता पेठ, एरंडवणा, अलका टॉकिज जवळी रुग्णालय, पिंपरी चिंचवड येथील तसेच अन्य सहा रुग्णालयांशीही फोनवर संपर्क साधला. परंतु, कोठेही बेड उपलब्ध नाही, असेच त्यांना सांगण्यात आले.

दरम्यानच्या काळात मार्केटयार्डातील एका रुग्णालयात व्हेंटिलेटर असलेला बेड उपलब्ध झाला. त्यांची कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सही ससूनच्या प्रवेशद्वारावर पोचली. अखेर पहाटे साडेपाच वाजता त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ओपीडीमध्ये उपचार सुरू असतानाच दुधाने खाली कोसळले अन् तेथेच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

या प्रकाराने व्यथित झालेले त्यांचे बंधू अनंत दुधाने 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "माझे भाऊ तानाजी यांना तापही आलेला नव्हता. केवळ श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. ते स्वतः चालू शकत होते. ईसीजीमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे, हे लक्षात येत होते. तरीही खासगी रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेतले नाही." कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले अन् आमच्याकडे जागा उपलब्ध नाही, असेच सांगितले. हा अऩुभव दुखःदायक होता. केवळ उपचार न मिळाल्यामुळे आमचा भाऊ गेला, असे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे कार्यकर्ते रमेश अय्यर यांनी, या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. रुग्ण अत्यवस्थ आहे, हे दिसत असूनही रुग्णालये अशी मनमानी कशी करू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुधाने यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असे निदान झाले आहे. पण, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी टाळाटाळ केली. आपत्तीच्या वेळी रुग्णांनी जायचे कोठे?, महापालिका, राज्य सरकार काही करणार आहे का, असाही प्रश्न त्यांनी विचारला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT