पुणे

वर्गणी गोळा करून केली कोरोनाग्रस्तांसाठी ऑक्सिजन बेड

कात्रज परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मॉर्निंग वॉक ग्रुपचा उपक्रम

सकाळ वृृत्तसेवा

कात्रज : भारती विद्यापीठ परिसरातील टमॉर्निंग वॉकला जात असलेल्या मित्रांनी भोरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन लावण्यासाठीचे चार ऑक्सिजन बेड आणि औषधे भेट दिली. भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या हस्ते बेड आणि औषधे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बामणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

मॉर्निंग वॉक ग्रुपमधील प्रा. संतोष मोरे यांनी कोरोनाग्रस्तांसाठी काहीतरी करण्याची कल्पना मांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिक राजाराम वीर, शेखर शिंगारे, गणेश मालुसरे, दादासाहेब कोंढरे व बापूसाहेब खिरीड यांनी कोरोनाग्रस्तांसाठी अत्याधुनिक बेड देण्याची तयारी दर्शवली. भोरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये अत्यवस्थ कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. मात्र तेथे अधिक बेडची आवश्यक्ता असल्याची माहिती राजाराम वीर यांना मिळाली. त्यानंतर भोरला बेड देण्याचा निर्णय घेण्यात आला. मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्य़ांनी वर्गणी गोळा करून बेडची खरेदी केली. प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते बेड रुग्नालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले.

यावेळी तहसीलदार अजित पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका आरोग्य अधिकारी सूर्यकांत क-हाळे, सारंग शेटे, सचीन घोणे, आप्पासाहेब कांबळे, सुरेश फाले, विनय पुरोहित, किरण काळे, अविनाश शेवते, व्यंकट सावंत व मनोज मुंगळे उपस्थित होते. आमच्या ग्रुपमार्फत लोकवर्गणी गोळा करण्याचे काम सुरु असून पुढील काळात आणखी बेड देण्यात येणार असल्याचे राजाराम वीर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT