पुणे

पुणे : एसटीच्या स्मार्टकार्डसाठी ज्येष्ठांना माराव्या लागताहेत चकरा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते...दिवसभर थांबवूनही काम होईल याची खात्री नाही...बसण्याची सोय नसल्याने तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते...वेळेत काम न झाल्याने ना जेवण ना गोळ्या...एवढं करूनही वेळेत पास मिळत नाही, अशी व्यथा आहे. राज्य परिवहन महामंडळा (एसटी) कडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील पासचे "स्मार्ट कार्ड' घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांची.

एसटीच्या स्वारगेट आगारात असलेल्या ज्येष्ठ नागरिक पास केंद्रावर हे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. एसटीच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे पाससाठी आलेले ज्येष्ठ नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत या केंद्राचे काम चालते. मात्र अर्जदारांची संख्या मोठी असतानाही केवळ एकच यंत्रणा व त्यासाठी एकच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  दोन शिफ्टमध्ये तेथील काम चालते. त्यामुळे अगदी भल्या सकाळी केंद्राबाहेरील रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांचा दुपारी एकच्या दरम्यान नंबर येतो व त्याची नोंदणी केली जाते. त्यात पुन्हा कागदपत्रांचा काही ख्वाडा आला तर पुन्हा उद्या या, असे सांगितले जाते. दोन-तीन चकरा मारून देखील नोंदणी झाली नसल्याने काही ज्येष्ठांनी सांगितले.

रांगेत थांबलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी केंद्राबाहेर पुरेशा खुर्च्या देखील उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. तसेच टोकनची यंत्रणाही नाही. त्यामुळे रांगेत थांबलेले ज्येष्ठच स्वतः पुढाकार घेऊन पाससाठी आलेल्यांची नावे एका कागदावर लिहितात व त्यांना नंबर देतात. या सर्व प्रक्रियेत मोठा वेळ जातो. त्यामुळे जेवणाला वेळ मिळत नाही व आजारपणाच्या गोळ्या खाता येत नाही, अशी तक्रार ज्येष्ठांनी केली. नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी पास दिला जातो. त्यासाठी देखील पुन्हा रांगेत थांबावे लागत आहे.

पाससाठी पौडवरून आलेले किसन येनपुरे याबाबत म्हणाले, "माझा कालचा पूर्ण दिवस याठिकाणी गेला. आज नऊ वाजता पोचलो तेव्हा देखील रांग होती. मी स्वतः नागरिकांचे नंबर घेतले असून त्यानुसार नोंदणी करीत आहोत. आम्हाला सहकार्य करण्यासाठी कोणीच याठिकाणी नाही. तर संदेश जाधव म्हणाले, "मी तिस-यांदा याठिकाणी आलो आहे. 50 नंबरच्या पुढे नंबर दिले जात नाहीत. आजारी असलेले अनेक नागरिक रांगेत उभे राहतात.''

ज्येष्ठांच्या पाससाठी मंडळाकडून केवळ एकच यंत्रणा देण्यात आली आहे. त्यावर दिवसातून 12 तास नोंदणीचे काम सुरू असते. इतर ठिकाणी केंद्र असतानाही ज्येष्ठ पुण्यातच पास काढण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे पास केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.

ज्येष्ठांच्या मागण्या :

- कर्मचारी व यंत्रणा वाढवावी
- टोकन नंबर द्यावेत
- कागदपत्रांची संख्या कमी करावी
- एकाच चक्करमध्ये नोंदणी करावी
- स्मार्ट कार्ड लवकर द्यावे
- केंद्राबाहेर बसण्याची व्यवस्था करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT