senior clerk caught while taking bribe at Pune  
पुणे

पुणे : वरिष्ठ लिपिकासह तिघावर लाच घेताना कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सावकाराचे निबंधक व विशेष निबंधक जमीनीबाबतचा पुनर्निरीक्षणाचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या वरिष्ठ लिपिकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. 

वरिष्ठ लिपिक अशोक देवराम गिते (वय 36, वर्षे), सेवानिवृत्त व सध्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या नंदकिशोर रामचंद्र झिने (वय 59) व सतीश क्षीरसागर असे कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. फिर्यादी यांच्यासह अन्य दोघांच्या जमिनीबाबतचे प्रकरण जालना येथील सावकाराचे निबंधक कार्यालय व औरंगाबाद येथील विभागीय निबंधक सहकारी कार्यालयाने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या निकालाविरुद्ध तक्रारदार व अन्य दोन  यांचे जमिनी संबधाने उप निबंधक/ सावकाराचे निबंधक जालना यांनी तसेच विभागीय निबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांनी तक्रारदार यांच्या प्रकरणांचा निकाल तक्रारदार यांचे बाजूने दिला होता.

त्या निकालाविरुद्ध पुनर्निरक्षणाचे (रिव्हिजन) अर्ज विरोधी पक्षकाराने पुण्यातील राज्य सावकाराचे महानिबंधक व विशेष निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाकडे दाखल केले होते. त्या तीन रिव्हिजनपैकी दोन रिव्हिजनचे निकाल हे तक्रारदार यांचे विरोधात दिले गेले, उर्वरित एक निकाल महानिबंधक याना सांगून  तक्रारदार यांच्या बाजूने करून देतो असे सांगून तिघानी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत विभागकडे तक्रर केली होती. त्यानुसार पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्षनाखाली मंगळवारी सहायक पोलिस आयुक्त वर्षाराणी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक उदय ढवणे, पोलिस कर्मचारी विनोद झगडे यांच्या पथकाने सापला रचुन तिघावर कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

SCROLL FOR NEXT