Senior Mathematician Dr Mangala Narlikar passed away at his residence in Pune  sakal
पुणे

Dr. Mangala Narlikar Passed Away : ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं पुण्यात निधन

रोहित कणसे

Dr. Mangala Narlikar Passed Away : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९) यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली.

पुण्यातील अंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्रात (आयुका) सोमवारी (ता.१७) सकाळी अंत्यदर्शन झाल्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी झाला. त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे. लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.

मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर १९६४ साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT