Prakash Ambedkar 
पुणे

Prakash Ambedkar: 2024 मध्ये मोदी-शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान

सरकार भी झुकती है, झुकाने वाला चाहिए....असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवसेनेसोबत युती केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आता चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठं विधान केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहंमत्री अमित शहा यांना मी तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे. पुण्यात ते बोलत होते. (Sensational statement of Prakash Ambedkar on PM Modi)

आंबेडकर म्हणाले, भाजपवाले म्हणतात की, आम्ही २०२४ मध्ये परत येऊ, मी म्हणतो २०२९ मध्येही याल कारण आम्हा सगळ्यांना तुम्ही तुरुंगात टाकणार तर तुम्हाला विरोध करणार कोण? पण २०२४ मध्ये भाजप आणि आरएसएसचं सरकार येऊ देऊ नका. मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही.

सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं एक कोणती चांगली गोष्ट केली आहे ते सांगावं. त्यांचं हिंदुत्व इथल्या मुस्लिम आणि ख्रिश्चनांबद्दल बोलणं असो. उलट मी नरेंद्र मोदींना विचारतो की भाजपत मोदींनंतर दुसरा पंतप्रधान कोण आहे? एकही माणूस आपल्या नजरेसमोर नाही जो देशाचं नेतृत्व करु शकतो. काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीत, दक्षिणेतील आणि उत्तर भारतातील राज्यातही हीच परिस्थितीत आहे. एक ही व्यक्ती सध्या या राज्यांमध्ये राहिली नाही की ती राज्याच्या बाहेर जाऊन नेतृत्व करू शकते. ED, सीबीआय, आयबीचा लोकांना धाक आहे, म्हणून सगळे लोकं त्यांना मुजरा करतात, हाथ जोडतात.

तुम्ही त्यांना दोनदा पंतप्रधान केलं. पण आता मोदींच्या मनात भीती आहे की, २००४ मध्ये त्यांचं चारित्र्य लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांच्याकडून बीबीसीचा माहितीपट दाखवणाऱ्यांना अटक केली जात आहे. ही फिल्म दाखवली तर आपली सत्ता जाईल याची त्यांना भीती आहे, म्हणून ती बॅन करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT