isolation arrangement of 100 persons at the University for corona virus 
पुणे

Corona Virus : विद्यापीठात १०० जणांची विलगीकरणाची व्यवस्था

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'अॅकेडमीक गेस्ट हाऊस' मध्ये १०० जणांची व्यवस्था केली आहे. हे गेस्ट हाऊस प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. 

महाराष्ट्रात 'कोरोना'चे रुग्ण सापडण्यामध्ये मुंबई नंतर पुण्याचा क्रमांक लागत आहे. पुणे शहरातील पाॅजिटीव्ह रुग्णांची संख्या ६०च्या पुढे गेली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेच्या नायडू रुग्णालयाची क्षमता संपत आली आहे.

नायडूमध्ये १०० खाटांची क्षमता असून, सध्या तेथे ८५ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी व विलगीकरणासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व वसतीगृह बंद करून ते प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यात खासगी संस्थांच्या वसतीगृहांसह पुणे विद्यापीठाचाही समावेश होता. 

पुणे विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थीनींचे वसतीगृह बंद असले तरी ते ताब्यात देण्यात आलेले नाहीत. विलगीकरण कक्षासाठी विद्यापीठाचे 'गेस्ट हाऊस' उपलब्ध करून दिले आहे. तेथे १०० खाटांची सोय आहे, मात्र अद्याप तेथे विलगीकरणासाठी कोणालाही ठेवण्यात आलेले नाही, असे कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. 

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डाॅ. संजीव वावरे म्हणाले, "सध्या विलगीकरणासाठी लायगुडे रुग्णालय सिंहगड रस्ता, सणस ग्राऊंड, बोपडी, दळवी रुग्णालय आणि खराडी रक्षक नगर येथे सुमारे ४५० जणांची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास इतर ठिकाणच्या वसतीगृहात विलगीकरणाची व्यवस्था केली जाईल. 

विद्यार्थ्यांचे साहित्य सुरक्षित
विद्यार्थ्यांना अचानक वसतीगृह रिकामे करावे लागले. त्यामुळे काही पुस्तक, कपडे घेऊन विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. रूमच्या कुलुपाच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत. या ठिकाणी विलगीकरण कक्ष केले जाणार नाहीत, असे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे बळी प्रवासी ठरले! मुंबई लोकलवरील अपघातात ३ जणांचा मृत्यू

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT