serum institute ready to produce covid19 vaccine ceo adar poonawalla 
पुणे

मोठी बातमी : कोरोना लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटची तयारी पूर्ण

रविराज गायकवाड

पुणे : संपूर्ण मानव जातीसाठी डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरसचा निपटारा करण्यासाठी जगभरातील संशोधकांनी कंबर कसली आहे. कोरोनावरील लस संशोधनात वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग सुरू आहेत. त्यातील ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस सगळ्यांसाठी आशेचा किरण ठरत  आहे. विद्यापीठाशी करार असल्यामुळं पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्डच्या लसीची निर्मिती होणार आहे. त्यासाठी सीरमची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. आजही जगभरात अनेक लहान मुलांना सीरमच्या लसी मोठ्या प्रमाणावर देण्यात येतात. अशा विश्वासार्ह संस्थेत कोरोनाच्या लस निर्मितीची तयारी सुरू आहे. सीरम जवळपास कोरोना लसीचे एक अब्ज डोस तयार करण्याच्या तयारीत असल्याचं सीएनएननं म्हटलंय.

सीरमला मिळाल्या 60 कोटी डब्या 
कोरोनावर लवकरात लवकर लस मिळावी, त्यातही ती भारतीयांना आणि गरीब देशांना लवकर मिळावी, यासाठी सीरम इन्स्टिट्यूट प्रयत्नशील असल्याचं इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलंय. त्यातही तयार होणाऱ्या लसीचे 50 टक्के डोस हे भारतीयांसाठी असतील, असंही त्यांनी जाहीर केलंय. कंपनीला काही दिवसांपूर्वीच 60 कोटी काचेच्या डब्या उपलब्ध झाल्या आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त लस तयार करण्याची क्षमता असल्यामुळं इन्स्टिट्यूटकडं मोठ्या आशेनं पाहिलं जातंय. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतातही होणार चाचण्या
सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या कोरोना लसीच्या भारतातील चाचण्या बाकी आहेत. या चाचण्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणे अपेक्षित आहे. लस दिल्यानंतर भारतीयांना कोणते साईड इफेक्ट्स होतात का? याची पडताळणी गरजेची आहे. केंद्रीय औषध नियंत्रण संस्था आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांनी सीरमला चाचणीसाठी अनुमती देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळं आदर पुनावाला यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात भारतात लसीच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले, आदर पुनावाला?
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी अमेरिकेतील, सीएनएन वाहिनीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत दिली. त्यात आदर पुनावाला म्हणाले की, कोरोनावरील लसीचा विचार केला तर, कोणतीही एक संस्था याची निर्मिती करू शकणार नाही. त्यासाठी एकमेकांची मदत घ्यावी लागेल. सध्या पाच वेगवेगळ्या पातळ्यांवर आम्ही कोरोना लसीची निर्मिती करत आहोत. त्यातील एक तरी प्रयोग निश्चित यशस्वी होईल, अशी आशा आहे. या पाचमध्ये आमच्या संस्थेच्या दोन लसींचाही प्रयोग आहे. त्याची प्राण्यांवरील चाचणी आणि इतर मानवी चाचण्यांचे टप्पे लक्षात घेता, इथून पुढे दीड वर्षांनंतर आमची लस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळंच आम्ही इतर संशोधन संस्थांशी करार करून, पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑक्सफर्डच्या लसीबाबत संशोधकांना विश्वास आहे. भारतातील चाचण्या यशस्वी ठरल्या तर, आपण ऑक्सफर्ड आणि आपल्या करारानुसार जगातील 70 देशांमध्ये ही लस वितरीत करू शकतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT