पुणे

नवरात्रात फूल बाजारात सात कोटींची उलाढाल 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  गणेशोत्सवाचा हंगाम शांत गेला; मात्र नवरात्रोत्सव फूल उत्पादकांना हात देऊन गेला. आता त्यांचे लक्ष दिवाळीकडे लक्ष लागले आहे. नवरात्रात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजारातील उलाढाल सुमारे सात कोटी रुपये झाल्याचा अंदाज आहे. 

यंदा गणेशोत्सवात फुलांना अपेक्षित भाव मिळाला नव्हता. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली होती. पितृ-पंधरवड्यानंतर नवरात्र हा फुलांच्या विक्रीचा हंगाम मानला जातो. विशेषत: या कालावधीत झेंडूची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. यंदा नवरात्रात फुलांच्या बाजारातील उलाढाल सात कोटी रुपये झाल्याचे फूल बाजाराचे प्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले. 

नवरात्रात झेंडूला प्रतिकिलो 50, तर शेवंतीला 75 रुपये भाव मिळाला होता. गणेशोत्सवात सजावटीच्या फुलांची मागणी वाढली होती. खंडेनवमी आणि दसरा या दोन दिवसांत झेंडूची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. यंदा दसऱ्याच्या आदल्यादिवशी एक लाख किलो झेंडूची आवक झाली होती. 

फूल उत्पादकांच्या दृष्टीने दिवाळी महत्त्वाची असतो. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. वाई येथील दीपक तरटे यांनी गणेशोत्सवात झेंडूला अपेक्षित भाव मिळाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तुलनेत नवरात्रात झेंडूला चांगला भाव मिळाला. पावसाने हुलकावणी दिल्याने दिवाळीत अपेक्षित उत्पादन येणार नाही. त्यामुळे जास्त भाव मिळण्याची आशा असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवरात्र आणि दिवाळी या दोन हंगामाचा विचार करून अर्धा एकर क्षेत्रात शेवंतीची लागवड केली आहे. नवरात्रात फुलांना चांगला भाव मिळाला. दिवाळीत यापेक्षा अधिक भाव मिळेल, अशी आशा आहे. 
- संतोष हाके, शेतकरी, यवत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT