पुणे

पुण्यात होणार साडेतीन हजार कोटींची गुंतवणूक;सात उद्योगांनी दिली पसंती

सकाळवृत्तसेवा

पुणे- व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकदारांसाठी आजही पुणे जिल्ह्याचे आकर्षण कायम आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत मंगळवारी झालेल्या करारात एकट्या पुणे जिल्ह्यात सात कंपन्यांनी तीन हजार ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यातून तब्बल २८ हजार ८७० रोजगार निर्माण होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत २५ बड्या कंपन्यांनी ६१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. पुणे, सातारा, रायगड, धुळे, पालघर, औरंगाबाद, जळगाव, नगर, कोल्हापूर, ठाणे, अमरावती आदी जिल्ह्यांत हे उद्योग लवकरच उभे राहणार आहेत. यातील सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यात येत आहेत. सात उद्योगांनी पुण्याला पसंती दिली आहे. 

पुण्यात येणाऱ्या उद्योगामध्ये गोयल गंगा, जीजी मेट्रोपोलिस, ग्रावीस, बजाज ऑटो, ॲम्प्स फार्मटेक्‍स इंडस्ट्रीज, सोनाई इटेबल इंडिया, क्‍लीन सायन्स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी या कंपन्यांचा समावेश आहे. गोयल गंगा आणि जीजी मेट्रोपोलिस यांनी आयटी पार्कमध्ये गुंतवणूक केली आहे. पुणे शहरात त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून २५ हजार नोकऱ्या आयटी सेक्‍टरमध्ये निर्माण होणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणून गुंतवणूक आकर्षित करण्याची आपली लीडरशिप राज्य सरकारने कायम ठेवली आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याबद्दल सरकारचे  अभिनंदन. करार झालेले प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे. पुणे विभागात येणाऱ्या या उद्योगांना उभे राहण्यासाठी जी काही मदत शक्‍य आहे, ती करण्यास मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर तयार आहे. तशा पद्धतीची बोलणी आम्ही सरकारशी केली आहेत.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT