Seven-Mantras 
पुणे

ज्येष्ठा गौरीसाठी सेव्हन मंत्राचा आता घरपोच भाजीपाला

सकाळवृत्तसेवा

पुणे - ज्येष्ठा गौरी नैवेद्यासाठी भाज्यांचे महत्व ओळखून सेव्हन मंत्राने ‘ज्येष्ठा गौरी नैवेद्य भाजीपाला बास्केट’ सादर केली आहे. यामध्ये १७  भाज्यांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणत्याही परिस्थितीत धोका निर्माण होऊ नये, यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ‘ज्येष्ठा गौरी नैवेद्य भाजीपाला बास्केट’ हा उपक्रम समोर आला आहे.

गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं महत्व आहे. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. यावेळी गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ तसेच मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. विविध प्रदेशात या काळात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

सामान्यतः गौरी-गणपतीच्या दिवसांत पालेभाज्यांचे दर गगनाला भिडलेले असतात. अनेकदा भाज्यांची उपलब्धता होत नाही. त्यामुळे मग परिपूर्ण गौरी नैवेद्य करण्याचा आनंद मिळत नाही. हे टाळण्यासाठी आजच सेव्हन मंत्राची ज्येष्ठा गौरी व्हेजिटेबल्स बास्केट बुक करा आणि निश्‍चिंत रहा. ठरलेल्या दिवशी आपली बास्केट घरपोच मिळेल. बास्केट बुक करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट आहे. बास्केटची घरपोच डिलवरी २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी एकपर्यंत करता येईल.

बास्केटमध्ये असणाऱ्या भाज्या
‘अळू पाने, आंबट चुका, लाल माठ, शेपू, कारले, दुधी भोपळा, काकडी, पडवळ, भोपळा, दोडका, गाजर, सुरण, रताळे, बटाटा, गवार, वाटाणा, शेवगा, भेंडी, मका कणीस यापैकी कोणत्याही १७ भाज्यांचा समावेश या बास्केटमध्ये असेल. आजच www.sevenmantras.com वेबसाइटला भेट देऊन, आपली बास्केट बुक करा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT