A seven year old girl who was playing in a temple area sexually assaulted in Pune  
पुणे

धक्कादायक! पुण्यात मंदिराच्या परिरसरातच चिमुरडीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मंदिराच्या परिसरामध्ये खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीला अनोळखी व्यक्तीने मंदिरामागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुतारवाडी पाषाण परिसरात घडली. 

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध बलात्कार व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अत्याचार दाखल करण्यात आला आहे.

पुणे-मुंबई 'एक्सप्रेस वे'वर आगीचा थरार; टँकर अन् कंटनेरला लागली आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहीणी असून त्यांना सात वर्षांची मुलगी आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री त्यांची मुलगी त्यांच्या घरासमोरील मंदिराच्या परिसरामध्ये खेळत होती. त्यावेळी काळ्या रंगाचा टिशर्ट व निळ्या रंगाची पँट परिधान केलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिला उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30

मुलीला त्रास होऊ लागल्याने गुरूवारी तिने याबाबत फिर्यादी यांना माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर खडकी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) माया देवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र दहीफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधीत अधिकाऱ्यांना गुन्ह्याच्या तपासाच्या सुचना दिल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT