Seventh Pay Commission imposed on 18000 employees of Pune Municipal Corporation 
पुणे

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी; तब्बल १८ हजार जणांना सातवा वेतन आयोग लागू

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची बुधवारी मंजुरी मिळाली. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर महापालिकेला ५८४ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, पुढील वर्षात अधिकारी-कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने आयोगाच्या फरकाची रक्कम मिळेल.

केंद्र व राज्य सरकारप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची मागणी महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. त्यानंतर नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव मंजूर करून तो पुढील प्रक्रियेसाठी सर्वसाधारण सभेत मांडला. त्यावर बुधवारी चर्चा झाली आणि उपसूचना देत हा प्रस्ताव मंजूर झाला. या निर्णयानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत अंमलबजावणी, त्याचा आर्थिक भार आणि नियोजनाची माहिती दिली.

महापौर म्हणाले, ‘‘महापालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल. या निर्णयात सर्व अधिकारी-कर्मचारी आणि महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली आहे. प्रस्तावाला सुसंगत उपसूचना मंजूर केल्या आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ५८४ कोटी रुपयांची गरज असून, पाच वर्ष महिन्याकाठी १० कोटी रुपये जादा खर्च येईल.’’

हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महापालिकेतील सभागृहनेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली.
पुणे पोलिस आयुक्तांचा दणका; आणखी दोन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT