पुणे

प्लॅस्टिक नाकारणारी कापडी पिशव्यांची चळवळ 

नीला शर्मा

"आधी केले, मग सांगितले,' या वाक्‍प्रचाराचं उदाहरण म्हणून भुसावळच्या शैला सावंत यांच्याकडे पाहायला हवं. आधी व्यक्तिगत पातळीवर त्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून जुन्या कपड्यांपासून शिवलेल्या पिशव्या वापरण्यावर भर दिला आणि मग याची चळवळच सुरू केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या आठ वर्षांत तेरा हजार कापडी पिशव्या लोकांना देऊन, "प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी ही वापरा हं,' असं आवाहन करणाऱ्या शैला सावंत हे वेगळंच व्यक्तिमत्त्व आहे. भुसावळमध्ये त्यांनी अनेकांना प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे पर्यावरणीय फायदे समजावून सांगितले. दोन वर्षांपासून पुण्यात राहायला आल्यावर त्यांनी इथंही आपलं काम सुरू ठेवलं आहे. त्या म्हणाल्या, ""भुसावळला असताना आठ वर्षांपूर्वी वसुंधरा दिनानिमित्त मी आमच्या सोसायटीच्या गेटवर कापडी पिशव्या घेऊन उभी राहिले. जाणाऱ्या - येणाऱ्या सभासदांना थांबवून प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका म्हणून सांगत होते. पर्याय म्हणून कापडी पिशवी त्यांच्या हाती देत होते. शेजाऱ्यांना हे पटलं. मग गल्लीतील रहिवाशांना, त्यानंतर आजूबाजूच्या गल्ल्यांमधील रहिवाशांना सांगायला गेले. पिशव्या तयार करण्यासाठी जुन्या साड्या परिचित महिलांना मागितल्या. नंतर परिसरातील लोकांना जुने कपडे या कार्यासाठी द्यायचं आवाहन केलं. शिलाईचा खर्च द्यायची विनंती अनेकांनी मान्य केली. अधूनमधून या कामात खंड पडला, तरीही आठ वर्षांमध्ये तेरा हजार पिशव्यांचा पर्याय कित्येक घरांमध्ये पोहोचला.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शैलाताईंनी असंही सांगितलं की, सभा, संमेलन, कार्यक्रम अशा ठिकाणी जास्त लोक भेटतात. तिथे जाऊन मी लोकांना कापडी पिशवी देत माझ्या कामाची माहितीही देते. मला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एक मीटर कापडातून तीन पिशव्या होतात. एका जुन्या साडीतून पंधरा पिशव्या. शिलाईसाठी फक्त तीन रुपये. उन्हाळ्यात मी माझ्या ड्रेसमधील टॉपच्या लांब बाह्या कापून अर्ध्या ठेवते. उरलेल्या कापडाच्या पिशव्या करते. लहान-मोठ्या पिशव्या माझ्यासोबत असतातच. भाजीवाल्याकडे गेल्यावर निरनिराळ्या भाज्या तोलून झाल्यावर स्वतंत्र पिशवीत घेते. घरी आणून त्या वेगळ्या करायचा वेळ आणि काम वाचतं. वेगवेगळ्या पिशव्यांसह भाज्या फ्रीजमध्ये ठेवते. किती सोपं. प्रत्येकाने स्कूटर, बॅग, पर्समध्ये पिशव्या ठेवल्या तर लागतील तेव्हा सहज वापरता येतात. छोटीशी घडी होत असल्याने बाळगायला सोप्या. धुवून वारंवार वापरता येतात आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याकडून प्लॅस्टिक पिशव्या घेणं टळतं. आपल्याकडून त्या कचऱ्याची भर पडत नाही. हीसुद्धा पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी ठरते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 मधील हकालपट्टीनंतर Mustafizur Rahman च्या मदतीला धावला पाकिस्तान; कवडी भावात PSL मध्ये खेळणार

संतापजनक प्रकार! कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ आढळला अर्धवट जळालेला मानवी पाय; सांगलीत उडाली खळबळ..

अर्जुन तेंडुलकर-सानिया चंढोक यांच्या लग्नाची तारीख ठरली; सचिन तेंडुलकरचा लेक लवकरच चढणार बोहोल्यावर

Latest Marathi News Live Update : पुण्यासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Makar Sankranti Vaan Ideas 2026 : मकस संक्रातीच्या वाणात काय द्यायचं ठरत नाहीये? मकर संक्रांतीसाठी पाहा उपयोगी वस्तूंची लिस्ट

SCROLL FOR NEXT