Shanta-Shelake-and-Pratibha Thorat
Shanta-Shelake-and-Pratibha Thorat 
पुणे

शांताबाईंच्या अप्रकाशित काव्यांना संगीताचे कोंदण; एका गाण्याला फेसबुकवर ५७ लाख ‘व्ह्यू’

संतोष शाळिग्राम

पुणे - मराठी सारस्वतांच्या नभांगणातील चतुरस्र आणि सर्जनशील कवयित्री शांता शेळके यांची अप्रकाशित काव्ये रसिकांसमोर येणार आहेत. गायिका प्रतिभा विनय थोरात यांना कवितांच्या दोन वह्या शांताबाईंनी भेट दिल्या होत्या, त्यातील ही काव्यसुमने आहेत. प्रतिभा यांनी या वह्यांचे जतन केले.  त्यातील तीन मराठी गाणी स्वरबद्ध केली. एका गाण्याला तर फेसबुकवर ५७ लाख व्ह्यू मिळाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शांताबाईंच्या अनेक काव्यांना संगीताचे कोंदण मिळाले. ती गाणी मराठी रसिकांच्या ओठी आहेत, त्यांची काव्यशिदोरी आजही साहित्यात दरवळत आहेत. पण त्यांची अनेक काव्ये प्रकाशित झालेली नाहीत. प्रतिभा यांच्याकडे असलेल्या वह्यांमधील काव्यांतून शांताबाईंची काव्यप्रतिभा पुन्हा रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. 

त्यातील विविध काव्यांना संगीतबद्ध करून त्याचे अल्बम तयार करण्याचा मानसही प्रतिभा यांनी व्यक्त केला आहे. शांता शेळके यांचा सोमवारी (ता. १२) जन्मदिवस. त्यानिमित्ताने ‘सकाळ’ने प्रतिभा थोरात यांच्याशी संवाद साधला. शांताबाईंच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘‘शांताबाईंचे भाऊ राम शेळके आणि माझे सासरे कृष्णराव थोरात यांचे खूप जवळचे संबंध होते. त्यामुळे शांताबाईंचा सहवास मला मिळाला. त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात कवितांच्या दोन वह्या मला दिल्या. त्यात युगुल गीते, गवळण, लावणी, भक्तिगीत, भावगीत अशा वैविध्यपूर्ण रचना त्यांनी लिहिलेल्या आहेत.’

रसिकांची प्रचंड पसंती
कवितांच्या या वह्यांमध्ये ६० काव्यरचना आहेत. त्यातील तीन गाणी संगीत देऊन स्वरबद्ध केली आहेत. यातील ‘बोलू नकोस काही’ या रचनेचा व्हिडीओ माझ्या फेसबुक पेजवर अपलोड केल्यावर त्याला ५७ लाख संगीत रसिकांची पसंती मिळाली. इतर दोन गाण्यांना १६ लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले. यावरून शांताबाईंच्या कवितांवर रसिक अजूनही किती प्रेम करतात, हे समजते. मुंबईतील संगीतकार दीपक पाटेकर आणि नरेंद्र भिडे यांनी तीन गाणी संगीतबद्ध केली आहेत. आणखी तीन गाणी तयार होत आहेत, असे प्रतिभा यांनी सांगितले. 

शांताबाईंच्या कवितांच्या वह्यांमध्ये काही अनुभव, कृष्णावर भाष्य आहे. बालगीते आणि अन्य काव्य प्रकार आहेत. त्या प्रत्येकाचा एक अल्बम होऊ शकेल. सहा गाणी तयार झाल्यानंतर प्रत्येक काव्य प्रकारात गाण्यांचा अल्बम करणार आहे. यातून शांताबाईंचे अप्रकाशित काव्य अजरामर करण्याचा माझा प्रयत्न आहे.
- प्रतिभा थोरात, गायिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT