Sharad Mahajan Sakal
पुणे

नागरिकरणातील तज्ज्ञ आणि `मशाल’ संस्थेचे संस्थापक शरद महाजन यांचे निधन

विविध विषयांतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि ‘मशाल’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आर्किटेक्ट शरद महाजन (वय ६७ वर्षे) यांचे बुधवारी आकस्मित निधन.

सकाळ वृत्तसेवा

पुणे/शिवाजीनगर - शहरीकरण, नगरनियोजन, परवडणारी घरे, आदी विविध विषयांतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि ‘मशाल’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आर्किटेक्ट शरद महाजन (Sharad Mahajan) (वय ६७ वर्षे) यांचे बुधवारी आकस्मित निधन (Death) झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

महाजन बुधवारी सकाळी वेताळ टेकडीवर फिरायला गेले होते. तेथे त्यांना असताना अचानक त्रास झाला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तेथे त्यांचा दुपारी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. शहरीकरण, परवडणारी घरे, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण, नगरनियोजन, झोपडपट्टी पुनर्वसन आदी विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. सुमारे ३५ वर्षे ते या क्षेत्रात सक्रिय होते. ‘यशदा’सह अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन संस्थांत व्याख्याते म्हणून त्यांना आमंत्रित केले जात होते. देशातील अनेक स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनातही त्यांचा सहभाग होता. नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी सक्रिय असलेल्या नागरिकांच्या अनेक गटांशीही त्यांचा निकटचा संपर्क होता. संगीत, नाट्य आदी कलांची त्यांना मनापासून आवड होती.

महाजन यांनी ‘मशाल’ची स्थापना १९८५ मध्ये केली. संस्थेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका, झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण (एसआरए), पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे स्मार्ट सिटी, म्हाडा आदी शासकीय संस्थांबरोबरही त्यांनी अनेक प्रकल्पांत काम केले. पुण्यातील झोपडपट्ट्यांचा त्यांच्या पुढाकाराने २०१२ मध्ये झोपडपट्टी सूची कोष (स्लम ॲटलॅस) तयार करण्यात आला. त्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या धर्तीवर पुण्यातील झोपडपट्ट्यांचे जीपीएस मॅपिंग करून त्याचा वापर निर्णय प्रक्रियेसाठी व्हावा, असा त्यांचा प्रयत्न होता.

येरवडा येथे पुणे महापालिका, केंद्र सरकार आणि मशालच्या माध्यमातून बीएसयूपीतंर्गत येरवडा भागातील वस्ती भागात सुमारे अडीच हजार घरे ‘इन्सि-टू’ पद्धतीने घरे उभारली. महापालिकेसाठी त्यांनी पर्यावरण सद्यस्थिती अहवालही तयार केला. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात नगरविकास योजना (टिपी स्कीम), परवडणारी घरे या बाबतही त्यांनी काम केले. उद्योगांच्या सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) माध्यमातून त्यांनी महापालिकां शाळांत संगणकीकरण, देखभाल दुरुस्ती, सुशोभकिरणाचेही प्रकल्प राबविले. कोरोनाच्या काळातही ‘मशाल’ने सुमारे ३० हजार गरजूंपर्यंद धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे किट पोचविले. तसेच सुमारे ३ हजार ५०० मजुरांना विमान, रेल्वे, बसद्वारे घऱापर्यंत पोचविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT