Sharad Mohol 
पुणे

शक्त्री प्रदर्शन प्रकरण - गुंड शरद मोहोळसह साथीदारांना जामीन

सकाळवृत्तसेवा

पुणे - गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करीत दहशत निर्माण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी हा आदेश दिला. खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी मंगळवारी (ता.16) रात्री अटक केली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२), स्वप्नील अरुण नाईक (वय ३५) आणि योगेश भालचंद्र (वय ४०) यांना अटक करण्यात आली होती. तर अक्षय भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खुनाच्या गुन्ह्यातून शरद मोहोळ याला येरवडा कारागृहातून नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यानंतर एका संघटनेच्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी २६ जानेवारी रोजी त्याला बोलविण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मोहोळ उपस्थित राहिला होता. त्यासह त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे आले होते. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. आरोपींनी आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. यावेळी नागरिक घाबरून पळाले होते. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शरद मोहोळ हा कुख्यात गुंड असून त्याची शहरात दहशत आहे. संबंधित कार्यक्रमाच्या वेळी कार आणि दुचाकीवरून येत त्यांनी गुरुवार पेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली. त्याठिकाणी एकत्रित येऊन आरोपींचा कोणते गैर कृत्य करण्याचा उद्देश होता का? याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्ह्यात वापरलेली वाहने आरोपींकडून जप्त करायची आहेत.

तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी खडक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे यांनी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवाद केला. आरोपींच्यावतीने ऍड. अमोल ढमाले, ऍड. मनीष पाडेकर,  ऍड. संजय साळुंखे आणि ऍड. अश्विनी खंडाळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT