Sharad Mohol Dead 
पुणे

Sharad Mohol Dead: "मामाचा घेतला बदला", शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर; पुणे पोलिसांनी सांगितला थरार...

काल पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी ८ तासात सर्व आरोपींना जेरबंद केले आहे.

Sandip Kapde

Sharad Mohol Dead: काल पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी ८ तासात सर्व आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सर्व आरोपींना अटक केली. दरम्यान आज पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण कारवाईचा थरार सांगितला. (Pune Police press conference in Sharad Mohol murder case)

हत्या का झाली?

शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या. मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले. या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमानास्य होते. यामुळे प्रकरणात हल्ला झाल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे.

दोन गाड्यांमध्ये दोन वकील होते. त्यांचा सहभाग काय होता. हे तपासात समोर येणार आहे. मुन्ना पोळेकर सुतारदरा परिसरात राहतो. गेल्या २० ते २५ दिवसांपासून तो शरद मोहोळ याच्या कार्यालयात जात होता. पोलिसांनी या प्रकरणात कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुरजि.नं. २/२०२४ भा. द. वि. कलम ३०२, ३०७, ३४ आर्म अॅक्ट कलम ३/७ (२५), महा पोलीस अधिनियमचे कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेच्या ९ पथकांनी घेतला आरोपींचा शोध -

पोलीस आयुक्त रितेशकुमार पुणे शहर यांनी सहायक पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा, पुणे शहर यांना तात्काळ आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा, पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १  सुनिल तांबे यांनी गुन्हे शाखेची ९ पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी पुणे शहर परिसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व कोल्हापुरच्या दिशेने रवाना केली होती.

दरम्यान खंडणी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार आरोपी गुन्हा केल्यानंतर चारचाकी वाहनातून पळून गेले होते. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांना आरोपी मुंबई -बंगळुर हायवेने साताऱ्याच्या दिशेने गेल्याचे दिसले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ज्या चारचाकीने जात होते. त्या कारला पोलिसांनी ट्रक केले. त्यानंतर ते खेड शिवापूर टोलनाका पास होवून पुढे जात असल्याची माहीती प्राप्त झाली. नंतर पोलीस आरोपीच्या शोधाकरीता तात्काळ साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले.

पोलीस अधिक्षक सातारा यांच्याशी संपर्क साधून पुणे पोलिसांनी सातारा मार्गावर व शिरवळ, आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ तपासात निष्पन्न झालेली संशयित स्विफ्ट गाडी पोलिसांना दिसली. या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला. या गाडीतून आरोपींना अटक केली. (Pune crime News)

हे आहेत अटक करण्यात आलेले आरोपी-

१) साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर वय २० वर्ष, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे, २) नामदेव महीपती कानगुडे वय ३५ वर्षे, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे ३) अमित उर्फ अगर मारुती कानगुडे वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे, ४) चंद्रकांत शाहू शेळके वय २२ वर्ष, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे, ५) विनायक संतोष गाव्हणकर वय २० वर्ष, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे, ६) विठ्ठल किसन गांदले वय ३४ वर्ष, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे, ७) अॅड. रविंद्र वसंतराव पवार, वय ४० वर्ष, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे. ८) अॅड. संजय रामभाऊ उड़ान वय ४३ वर्ष, रा. भुसारी कॉलनी कोथरूड पुणे. तसेच स्वीफ्ट गाडी, महींद्रा एक्सयुव्ही या वाहनांसह ताब्यात घेतले. गुन्हयात वापरलेले ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे, ८ मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम असा एकून २२ लाख ३९ हजार ८१० रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT