Sharad Pawar|Ajit Pawar Esakal
पुणे

Baramati Loksabha: साखर पट्ट्यात पवारांनी ताकद लावली पणाला, अजित पवार गटाचे नेते बाळासाहेब तावरेंची घेतली भेट

Sharad Pawar: "तुम्ही माझ्या आणि सुप्रिया सुळेंच्या बरोबर आहात असे मी समजतो," अशा मोजक्या शब्दात पवार यांनी संबंधित कुटुंबियांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

कल्याण पाचंगणे

माळेगाव: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांची आज माळेगावच्या निवासस्थानी भेट घेतली. तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आहे. याशिवाय माळेगावात राजकिय दृष्ट्या महत्व असलेल्या बुरूंगले, सस्ते कुटुंबियांनाही शरद पवार यांनी भेटी दिल्या.

"तुम्ही माझ्या आणि सुप्रिया सुळेंच्या बरोबर आहात असे मी समजतो," अशा मोजक्या शब्दात पवार यांनी संबंधित कुटुंबियांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, अ‍ॅड. एस. एन. जगताप, प्रमोद जाधव, गौरव जाधव, श्रीहरी येळे, शरद तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विशेषतः याआगोदर शरद पवार यांनी सांगवी येथे भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांची, तर सोमेश्वर परिसरात काकडे कुटुंबियांचीही भेट घेतली होती. या राजकिय स्थितीचा विचार करता बारामती तालुक्याच्या साखर पट्ट्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुतारी चिन्हाला आधिकाधिक पाठींबा मिळावा, या उद्देशाने खुद्द शरद पवार यांनी आपली शक्ती पणाला लावल्याचे दिसत आहे.

दरम्यान, माळेगावात बाळासाहेब तावरे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याचा पार पडलेल्या ऊस गळीत हंगामाची व उत्पादित साखर पोत्यांची माहिती घेतली.

यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी १३ लाख २७ हजार ९०८ टन ऊसाचे गाळप झाल्याचे सांगितले. तसेच १० कोटी ६२ लाख ७२ हजार आठशे युनिट इतकी विज निर्मिती झाल्याचे सांगितले. त्यापैकी ६ कोटी १४ लाख युनिट विजेची विक्री झाल्याची माहिती अधिकारी पाटील यांनी दिली.

दुष्काळी पार्श्वभूमी असतानाही माळेगाव, सोमेश्वरचे चांगले गाळप झाले असून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दुसरीकडे, बाळासाहेब तावरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "पवारसाहेबांची कोणतीही राजकिय भेट नव्हती. पवारसाहेबांचे पुर्वीपासून माझ्या कुटुंबियांशी चांगले संबध राहिलेले आहे. त्या आपुलकीच्या नात्यातून माझ्या घरी आले होते. एकमेकांच्या तंबेतीबाबत चर्चा झाली. कौटुंबिक मुलाबाळांची विचारपुस झाली. यापेक्षा वेगळी राजकिय चर्चा झाली नाही," असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT