Agitations Sharad Pawar residence ST Employees NCP workers gather Govind Bage Baramati on Tuesday  sakal
पुणे

यंदा विक्रमी साखर निर्यातीची संधी, शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात साखर परिषदेत राज्यातील मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली. शरद पवारांसोबत राज्यातील मंत्री या परिषदेला हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधन केलं. महाराष्ट्रात यंदा विक्रमी साखरेचं उत्पादन झालं आहे. ही येणाऱ्या काळात साखर निर्यातीसाठी संधी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. Sharad Pawar In Sugar Summit)

साखर उत्पादनात ब्राझीलचा पहिला नंबर होता. आता तो भारताने घेतला आहे, असं पवार म्हणाले. या वर्षी सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रातून झालं. ही प्रगती झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.आता यापुढे जाऊन दिशा शोधाव्या लागतील. गेल्या २ वर्षात पाऊस चांगला झाला. यामुळे आता उसाचे क्षेत्र अजून वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

निर्यातीवर लक्ष्य ठेवावं लागेल

काही हवामान तज्ञ यांच्या मते या वर्षी पाण्याची स्थिती चांगली राहील. ऊसतोडणी च नियोजन कारखाने सुरू होण्यापूर्वी करावं लागेल. कारखाने यांनी यागोष्टी ची अंमलबजावणी होईल याची खात्री घ्यावी. साखरेची निर्यात देखील चांगली झाली. यावर्षी विक्रमी साखर तयार होईल असं दिसत असल्याचं पवार म्हणाले. या वर्षी भारतातून ९० लाख टन साखर निर्यात होऊ शकते.

गेल्या ३ हंगामापासून कारखानदारांनी साखर निर्यात केली. या हंगामात ६४ लाख टन निर्यात साखरेचे करार झाल्याची माहिती त्यांनी दिली. हा साखर उद्योगाला दिलासा आहे.

महत्वाचे मुद्दे

  • अफगाणिस्तान हा गिऱ्हाईक आहे पण ३ लाख टन पर्यंत खाली आली आहे

  • बांगलादेश आणि इंडोनेशिया या २ देशांनी जास्त साखर खरेदी केली

  • १२१ देशात साखर भारतातून गेली ही अभिमानाची गोष्ट आहे

  • VSI आणि पुणे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये करार झाला आहे. कारखाने आणि शेतकऱ्यांची स्थिती सक्षम होण्यासाठी याची मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT