sharad pawar is our amitabh bachchan says jitendra awhad 
पुणे

Vidhan Sabha 2019 : 'शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत, या वयात ही तरुणाईला ते भुरळ घालतात, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आजही पवार आहेत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आव्हाड आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

मी 35 वर्षे राजकारण पाहतो आहे. गेल्या 35 वर्षांत काहीही बदलले नाही. 1990च्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर टीका केली, आज मोदी-शहा तेच करत आहेत. पवार आहेत तिथेच आहेत. किती आले किती गेले पवार त्यांच्या उंचीवरच आहेत असे आव्हाड म्हणाले. पंतप्रधान मोदी नवाज शरीफ यांना मिठी मारतात आणि भारतात येऊन पाकिस्तानवर टीका करतात असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचा कांदा चालतो, साखर चालते, तिथले नेते नवाज शरीफ यांना मिठ्या मारलेल्या चालतात आणि इथे येऊन ते पाकिस्तानवर टीका करतात. हे धोरण दुटप्पीपणाचे असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी  केली. नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदीवर काही बोलत नाहीत. शेतीमाल, भावावर बोलत नाहीत. महाराष्ट्रावर आलेले कोल्हापूर, सांगली इथले संकट नाही त्यांना दिसले नाही. भाजप शिवसेना युतीवर बोचरी टीका करत शिवसेनेला 100 जागा दिल्या तरी युती होईल नाही तर शिवसेना पक्षच फुटेल असा टोला ही आव्हाड यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Latest Maharashtra News Updates : गोंदियाच्या उच्चेपूर गावात सुरू होणाऱ्या बिअर बारला ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT