Baramati Lok Sabha Election Result 2024 Esakal
पुणे

Baramati Lok Sabha Result: अमेरिकेतही पवारांची चर्चा! ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकले शरद पवार-सुप्रिया सुळेचे फोटो; Video Viral

Baramati Lok Sabha Election Result 2024: सातासमुद्रापार अमेरिकेतही सुळेंच्या विजयाच्या शुभेच्छांचा बॅनर झळकल्याचे चित्र आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार ३३३ मतांच्या मोठ्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत काही महत्त्वाच्या जागांवर देशासह जगाचं लक्ष लागलं होतं. त्यापैकी एक म्हणजे बारामती. बारामतीत एकाच कुटुंबातील व्यकी एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. दरम्यान या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच सातासमुद्रापार अमेरिकेतही सुळेंच्या विजयाच्या शुभेच्छांचा बॅनर झळकल्याचे चित्र आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार ३३३ मतांच्या मोठ्या फरकाने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर त्यांचे अभिनंदन करणारा मोठा बॅनर लावण्यात आला आहे. बॅनरचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सुप्रिया सुळेंनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा विजय प्राप्त करत बाजी मारली. अत्यंत चुरशीची निवडणूक होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता.

मात्र, अपवाद वगळता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर व खडकवासला या सहाही विधानसभा मतदारसंघांत सुप्रिया सुळे यांनी पहिल्यापासूनच घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा करिष्मा आणि सुप्रिया सुळे यांची मेहनत याला जनतेने कौल दिला आहे.

निवडणुकीअगोदर मांडलेली अनेक गणिते चुकीची ठरवत, आमदार, पदाधिकारी जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने असले, तरी मतदारांनी मात्र सुप्रिया सुळे यांच्याच पारड्यात मते टाकून आपला विश्वास व्यक्त केल्याचे दिसते.

अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविले तेव्हापासूनच या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. पवार कुटुंबातच लढत होत असल्याने ‘बारामतीवर वर्चस्व कोणाचे?’ हा प्रश्न उपस्थित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT