पुणे

Loksabha 2019 :  राजीव गांधींमुळे ‘शरद पवार’ बचावले!

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे केव्हा कोठे अडसर येईल, हे सांगता येत नाही. म्हटले तर कायद्याचा अर्थ कसा निघू शकतो, ते नुकतेच धनकवडीतील एका घटनेतून दिसून आले. त्यात माजी पंतप्रधान राजीव गांधींमुळे शरद पवार बचावले!

आचारसंहितेमुळे राजकीय नेत्यांच्या नावांच्या पाट्या झाकण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या मदतीने हाती घेतली आहे. त्याला पोलिसही मदत करीत आहेत. पाट्या झाकण्यासाठी स्टिकरच्या २० हजार मीटरची रिळेही महापालिकेने खरेदी केली आहेत. त्यानुसार आता रस्त्यावरील पाट्या झाकल्या जाऊ लागल्या आहेत. धनकवडीमध्येही निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिस शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनवर पोचले. हे भवन म्हणजे महापालिकेची चार मजली इमारत असून, तिला शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. अधिकारी पवार यांच्या नावाची पाटी झाकणार होते. परंतु, स्थानिक नगरसेवकाने आक्षेप घेतला. पवार यांचे नाव झाकायचे असेल तर राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयावरील राजीव गांधी यांचेही नाव झाका, असे म्हणणे त्यांनी मांडले. त्यामुळे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलिसांपुढे पेच पडला.  त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी प्रांतस्तरावरील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना हा प्रकार सांगितला. 

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पवार यांच्या नावाची पाटी झाकू नका, असा आदेश दिला. त्यामुळे पेच सुटला अन्‌ राजीव गांधींमुळे शरद पवारचही बचावले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT