Sharad Ponkshe esakal
पुणे

Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे यांच्या विरोधात पुण्यात तक्रार!

हिंदू समाजबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : जाहीर कार्यक्रमात हिंदू समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया व सहकार विभागाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Sharad Ponkshe Complaint filed against actor Sharad Ponkshe in Pune)

तक्रारीत म्हटलं की, डोंबिवली येथे झालेल्या एका कार्यक्रमात पोंक्षे यांनी 'अहिंसा परमो धर्म:'चे एवढे ढोस आम्हाला पाजले की, "हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हे आम्हाला कळलचं नाही" असे वक्तव्य केलं. "हिंदू कधी नपुंसक झाला हे कळालंच नाही" असं विधान करत त्यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे. पोंक्षेंनी मागील महिन्यात पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली होती.

त्यामुळं वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधानाविरोध भारतीय दंड संहिता कलम 298, कलम 295(अ), कलम 153(ब) नुसार शरद पोंक्षेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी बळीराम डोळे, शकाका मारकड, श्रीविजय हुलवान, योगेश फुले आदींनी ही तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT