शिक्रापूर : २२ मार्च ते ७ जुलै या साडेतीन महिन्यात तब्बल १६ कोरोनारुग्ण आढळलेल्या शिक्रापूरात पुढील १४ दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला असून सरपंच हेमलता राऊत, शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे यांनी जाहिर केले. दरम्यान, सदर माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांना समक्ष जावून दिली असल्याचे शहाणे यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२२ मार्च रोजी एका टोलनाक्यावरील कर्मचा-याला कोरोनाची लागन झाल्याने शिक्रापूर जिल्ह्यात सर्वात प्रथम कोरोना-हॉटस्पॉट ठरले होते. पुढे साधारण पंधरा दिवसांच्या अंतराने शिक्रापूर आणि परिसरात कोरोना पेशंट सापडण्याचा प्रकार सुरू राहिला तो आज पर्यंत. आजच्या तारखेला शिक्रापूरात एकुण १६ कोरोनारुग्ण सापडे असून एक रुग्ण दगावला आहे. दर चार दिवसाला साधारण आठ ते दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवावे लागत असल्याने शिक्रापूरची कोरोनास्थिती भिषण आहे. याच पार्श्वभूमिवर आज सरपंच हेमलता राऊत, माजी सरपंच भगवानराव वाबळे, जयश्री भुजबळ, नवनाथ सासवडे तसेच माजी सरपंच रामभाऊ सासवडे, शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिरुर तालुका सराफ असोसिएशनचे सचिव अशोकशेठ शहाणे यांनी एकत्र येवून पुढील १४ दिवस म्हणजेच दि.२१ तारखेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून यात शिक्रापूरातील सुमारे नऊशे छोटे-मोठे व्यापारी सहभागी होणार असल्याचे शहाणे यांनी सांगितले.
-------------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा
-------------
यात बंदमध्ये सर्व मेडिकल स्टोअर्स, सर्व दवाखाने आदी वगळण्यात आल्याचे सरपंच हेमलता राऊत यांनी सांगितले. या चौदा दिवसांच्या काळात ग्रामपंचायत स्तरावर संपूर्ण गावात औषध फवारणी, सार्वजनिक स्वच्छता याबाबत काम करणार असून ग्रामस्थांकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याचे सरपंच सौ.राऊत यांनी सांगितले.
१४ जुलै पर्यंत पिंपळे-उपबाजार बंद..
शिरुर कृषी उप्तन्न बाजार समितीच्या पिंपळे-जगताप उपबाजारात तीन आडते व्यापारीच कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने संपूर्ण उपबाजार पुढील आठ दिवस (दि.१४) पूर्ण सिल केला असून संपूर्ण उपबाजाराचा ३० एकराचा परिसर निर्जंतूक करण्याचे काम संस्थेकडू सुरू केल्याची माहिती सभापती शंकर जांभळकर यांनी दिली. दरम्यान वरील तीन आडत्यांच्या संपर्कात असलेल्या दहा जणांना उपबाजार रुमध्येच कोरंटाईन केले असून केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथाकाकडून या सर्वांवर लक्ष ठेवून त्यांचे स्वॅप रिपोर्ट येईपर्यंत लक्ष ठेवले जाणार असल्याचे श्री जांभळकर यांनी सांगितले.
पाबळमध्ये डॉक्टरच कोरोनारुग्ण
शिक्रापूरात ३० मार्चच्या दरम्यान निष्पन्न झालेल्या व काही दिवसातच कोरोनामुक्त झालेल्या डॉक्टरनंतर आता पाबळ (ता.शिरूर) मध्ये एक वैद्यकीय व्यावसायिक कोरोना पॉजिटिव्ह निष्पन्न झाल्याने संपूर्ण पाबळमध्ये कोरोनाबद्द्ल प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमिवर पुढील तीन दिवस संपूर्ण पाबळ मधील संपूर्ण व्यापार व व्यवसाय बंद करण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याची माहिती सरपंच पल्लवी डहाळे व उपसरपंच अमोल जाधव यांनी दिली. दरम्यान कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कातील दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नसल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.