Shirur Lok Sabha: 
पुणे

Shirur Lok Sabha: "मग होऊन जाऊ द्या कोल्हे विरुद्ध वळसे पाटील, कळेल घाट कोण मारतो" ; शरद पवार गटाचे अजितदादांना आव्हान

अमोल कोल्हे शेतकरी आक्रोश मोर्चातून अजित पवार गटावर टीका करत आहेत. काल पुण्याच्या खेड तालुक्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी अजित पवार गटाला आव्हान दिले.

Sandip Kapde

Shirur Lok Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात पाय रोवायला सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे देखील शेतकरी आक्रोश मोर्चातून अजित पवार गटावर टीका करत आहेत. काल पुण्याच्या खेड तालुक्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी अजित पवार गटाला आव्हान दिले.

विलास लवांडे म्हणाले, "अजितदादा तुम्ही पार्थ पवारांना मावळ लोकसभेत उभं करा आणि आधी त्यांना मावळमधून खासदार करून दाखवा. मग अमोल कोल्हे यांच्या पराभवाचे बघू आणि शिरूर लोकसभेतून दिलीप वळसे पाटलांना उभं करा. त्यांनी कोल्हे यांना खासदार करण्यात वाटा उचलला ना मग होऊन जाऊ द्या. कोल्हे विरुद्ध वळसे पाटील अशी बारी होऊ दे, मग कोण घाट मारतो हे कळेलच," (Latest Marathi News)

महाशक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसवर दरोडा टाकला. मुंबईचे अस्तित्व कमी करण्याचे प्रयत्न होत आहे. मला अजित पवार यांना विचारायंच आहे. त्यांना कोणाचा विकास करायचा आहे. पुणे जिल्ह्याचा विकास शरद पवार यांच्यामुळे झाला. लाभार्थ्यांच्या टोळीचं तुम्ही नेतृत्व करता, असे विलास लवांडे म्हणाले.

अजित पवार यांनी सांगितलं अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते बघतो. मला अजित पवार यांना सांगायचं आहे. तुमचा उमेदवार तर ठरला नाही. जर अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा असेल तर दिलीप वळसे पाटलांना उभं करा. अजित पवार आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केल्यामुळे अमोल कोल्हे निवडून आले, असे तुम्ही (अजित पवार) म्हणाला होता. मग वळसे पाटलांना उभं करु, मग बघू काय होत, असं विलास लवांडे म्हणाले.

विलास लवांडे म्हणाले, "अजितदादा तुम्ही पार्थ पवारांना मावळमधून निवडून आणा. यावेळी तिथे निवडून आणा, मग गप्पा मारु. तुम्हाला कांद्याचा प्रश्न सोडवता नाही आला. दिल्लीत वट आहे तर हे प्रश्न सोडवा. साक्षी मलिक यांच्या डोळ्यातील अश्रू पुसायला रुपाली चाकणकर यांना पाठवा. तुम्ही कशाचा विकास करणार."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT