corona test esakal
पुणे

शिरुर : तळेगाव ढमढेरे आरोग्य केंद्रातील कोरोनाबाधितांची साखळी तुटतातुटेना

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १६ गावात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १६ गावात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून चालू आठवड्यात सुमारे ४५० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (ता. ८) एका दिवसात केंद्रात ९१ लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यात केंद्रातील तळेगाव ढमढेरे, सणसवाडी व शिक्रापूर गावातील कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.

तळेगाव ढमढेरे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायत, महसूल व आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने ग्रामस्थ व प्रशासन चिंताग्रस्त झाले आहेत.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत बाधितांचे प्रमाण जास्त असले तरी उपचारानंतर रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही जास्त आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाणही जास्त असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांना विविध ठिकाणच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. दवाखान्यातील उपचारासाठीचा अफाट खर्च अनेक कुटुंबाना पेलवत नसल्याने अनेकजण हतबल झाले आहेत.

"तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना बाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून, गरजूंनी या केंद्रात उपचार घेऊन कोरोनावर मात करावी" असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले आहे. दरम्यान, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळावे, सोशल डिस्टन्स पाळावा व लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळावेत," असे आवाहन आमदार पवार यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT