dhanori.jpg 
पुणे

आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांसह `त्यांनी` अनोख्या पध्दतीने साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी (पुणे) : धानोरी येथील छावा संघटनेकडून  १०० आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पत्नींना धान्य व शेतीसाठी बी-बियाणे वाटप करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना स्मरून हा शिवराज्याभिषेक सोहळा छावा संघटना महाराष्ट्र राज्य व शिवराज्याभिषेक महोत्सव समिती खेड तालुका यांनी साजरा केला.

काम देत का कुणी काम : ओझी उचलू, कुठेही राबू पण...
दुष्काळ व कर्जबाजारीपणा या गोष्टींना कंटाळून ज्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या शेतकरी बांधवांच्या पत्नी आज लाॅकडाउनमुळे काय हलाखीचे जीवन जगत असतील किंवा त्यांच्याकडे माणुसकीच्या नात्याने आपण पाहिले पाहिजे, असा विचार करून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पत्नींना गाव तलवाडा, (ता. गेवराई जि. बीड) येथे अन्नधान्य वाटप व साडीचोळी सोबत शेतीमध्ये लागणारे चांगल्या प्रतीचे बी बियाणे हे त्यांच्या बांधावर जाऊन देण्यात आले सोबतच युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पत्नीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

छावाप्रमुख धनंजय जाधव, सोमनाथ ढोले यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व गणेश सोनवणे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय सदाशिव सोनवणे व मित्र स्व. किशोर गिरमे यांच्या स्मरणार्थ बी बियाणे वाटून हा उपक्रम राबवला.या उपक्रमासाठी गेवराई पंचायत समितीच्या सदस्य पूजा मोरे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी गंगाधर काळकुटे, सौरभ दोंडकर, प्रणय शेंडे, अभिजित उकारडे, यशवंत बागल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT