पुणे

आषाढी वारीसाठी शिवछत्रपतींच्या पादुकांचे रायगडाकडे प्रस्थान

दत्ता म्हसकर

जुन्नर : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे किल्ले शिवनेरीहून रायगडच्या दिशेने आज गुरुवारी ता. २४ रोजी प्रस्थान झाले. शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष आहे. श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवाई देवीची महापूजा, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडच्या दिशेने प्रतिकात्मक हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.

शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर, खेड, पुणे मार्गे श्री शंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर गडावर विसावा घेऊन पुढे राज्याभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोचतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ पाचच शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुकांची प्रस्थान पूजा करुन जुन्नरहून घेऊन गेले आहेत. शक्ति परंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी शिवनेरीहुन संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राज्याभिषेकापासून पुढील पाच दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षभरासाठी पादुका शिवजन्मभूमीत परत येतात.

कोरोनामुळे शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी योगऋषी सुधीर इंगवले, ऍड. भाऊसाहेब शिंदे, ऍड. राहुल कदम, साहिलबुवा शेख व पलाश देवकर यांना मिळाली आहे. कोरोनाचे नियम-निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, नेत्राली ताजणे, संतोष परदेशी, कल्पेश परदेशी, केदार पुरवंत, हर्षवर्धन कुर्हे, सुशांत शिंदे, सूरज खत्री यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT