Mahashivratri
Mahashivratri 
पुणे

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचं 'देऊळ बंद'; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Mahashivratri 2021: पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील शिव मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी घरीच पूजाअर्चा करावी. मंदिरात दर्शनाला येऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासन आणि मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे. मंदिरे बंद असली तरी पूजा आणि अभिषेक असे विधी पूजाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

याबाबत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या शिव मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक घेण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन, त्यांना पोलिसांकडून करण्यात आले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला भाविकांनी घरातच पूजा अर्चा करावी. मंदिरात दर्शनासाठी येऊन गर्दी करू, नये, असे आवाहन पोलिसांसोबतच मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे.

शहरातील पाताळेश्वर लेणी, ओकांरेश्वर मंदिर, श्री तारकेश्वर मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, अरण्येश्वर, वाघेश्वर या महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. तर अनेक ठिकाणी पूजा-अर्चा बरोबरच मंदिराबाहेर यात्रा भरल्याने विक्रेत्यांची रांग लागलेली असते. त्यामुळे यंदा गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस अगोदरच मंदिर विश्वस्तांची बैठक घेतली. भाविकांना कोरोनाच्या संसर्ग वाढू नये म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. दिवसाचा आकडा हजाराच्या पार गेला आहे. अशात गर्दी होणे परवडणारे नाही. त्यामुळे प्रशासनाने महाशिवरात्रीला मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराबाहेर तशा सूचना असलेल्या पाट्या देखील मंदिर विश्वस्तांना लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT