Shivajirao Bhosale Bank  sakal
पुणे

शिवाजीराव भोसले बॅंक : गैरव्यवहाराची रक्कम ४३६ कोटींवर

सहकार विभागाकडून चाचणी लेखापरीक्षणात आक्षेप, न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम ७२ कोटींवरून आता ४३६ कोटींवर पोचली आहे. सहकार खात्याच्या चाचणी लेखापरीक्षणात ही बाब समोर आली असून, या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हा विशेष न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी चाचणी लेखापरीक्षणामध्ये संचालक आणि संबंधित बॅंक अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराबाबत गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.

पुण्यातील शिवाजीनगर येथे मुख्यालय असलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत ७२ कोटींच्या रोख रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या गुन्ह्याची व्याप्ती पाहता सहकार आयुक्तांनी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मागील ऑक्टोबर महिन्यात चाचणी लेखापरीक्षण आणि नोव्हेंबर महिन्यात आनुषंगिक अहवाल सहकार आयुक्तालयाकडे सादर करण्यात आला.

तत्कालीन अध्यक्ष, सर्व संचालक, कर्जदार, कर्ज अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापकांनी संगनमताने ४३६ कोटी ५५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आक्षेप या अहवालात नोंदविला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत ८२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग १) चंद्रशेखर गव्हाणकर यांनी दिली. दरम्यान, चाचणी लेखापरीक्षणानुसार जिल्हा विशेष न्यायालयात संबंधित आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पत्र आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा विशेष लेखापरीक्षकांना पाठविले आहे.

चाचणी लेखापरीक्षणात नोंदविलेले आक्षेप :

  • कर्ज आणि जामीनदारांची परतफेड क्षमता न पाहता नियमबाह्य कर्जे मंजूर

  • कर्ज मंजूर करताना पुरेसे आणि विक्रीयोग्य तारण मालमत्ता घेतली नाही

  • एकाच कर्जदारास विविध शाखेतून एकाच तारणावर कर्ज वितरण

  • कर्ज निधीचा गैरव्यवहार करण्यास बॅंक व्यवस्थापनाचेही पाठबळ

  • संगनमताने ठेवीदारांचे आर्थिक हित धोक्यात आणून गैरव्यवहार

''शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि संचालकांविरोधात यापूर्वी ७२ कोटींची रोकड गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाचणी लेखापरीक्षणानुसार अफरातफर केल्याची रक्कम ४३६ कोटींवर पोचली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.''

- चंद्रशेखर गव्हाणकर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग १)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT