शिवसेनेला भगव्याची लाज वाटते; देवेंद्र फडणवीस
शिवसेनेला भगव्याची लाज वाटते; देवेंद्र फडणवीस  sakal media
पुणे

शिवसेनेला भगव्याची लाज वाटते; देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली होती. पण गेल्या पाच वर्षात भाजपने मेट्रो, नदी सुधार, पाणी पुरवठा योजना यासारख्या योजना राबवून पुढील २५ वर्षाचे नियोजन केले आहे. कोरोनामध्ये राज्य सरकारने मदत न करताही पुणे महापालिकेने रस्त्यावर उतरून काम केले. यामुळे पुणेकरांच्या मनात भाजपच असल्याने पुढच्या वेळी सुद्धा महापालिकेवर भाजपचा भगवा फडकेल, असा विश्‍वास विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘भाजपने आज चे हे शक्ती प्रदर्शन नाही. हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. या गर्दीने पुन्हा एकदा महापालिकेवर भाजपचा भगवा व रिपाइंचे निळा फडकणार असल्याची खात्री दिली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे कितीही पक्ष एकत्र आले तरी पुणेकरांच्या मनात भाजपच आहे. शिवसेना तर नावालाही उरलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात लस तयार झाली. मोदींनी मोफत लस दिली म्हणून राज्य सरकार लसीकरण करू शकले. महाराष्ट्रात फक्त वसुली, खंडणी आणि भ्रष्टाचार सुरू आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महापालिकेचे नगरसेवक म्हणजे केवळ गटार, पाणी, रस्ता हीच कामे करणारे आहेत असे वाटत होते. पण भाजपची सत्ता आल्यानंतर नगरसेवक म्हणजे मेट्रो, २४ तास पाणी प्रकल्प करणारा लोकप्रतिनिधी अशी व्याख्या बदलली आहे. गिरीश बापट यांनी संघर्षातून हा पक्ष वाढवला आहे. त्यांनाही पक्षाचे कार्यालय बघून आनंद होईल.

शिवसेनेला भगव्याची लाज

पूर्वी भगव्याची शपथ घेणारे आता भगव्याशी संबंध नसणारे व हिंदुत्ववादी म्हणून घेण्यास लाज वाटते अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हे लोक रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतातच. पण संसदेतून निलंबित झालेल्या शिवसेना खासदारांनी माफी मागण्यास नकार देत माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे वक्तव्य केले. अरे निर्लज्जांनो तुम्हाला सावरकरांच्या नखाची सर तुम्हाला येऊ शकणार नाही. तुम्हाला राज्याची जनता माफ करणार नाही, अशी टीका शिवसेनेवर केली. आम्ही सावरकरवादी, हिंदुत्ववादी आहोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणेच काम करतो हे आम्ही ठणकावून सांगतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

Bengaluru Crime: बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह! आई आहे मानवाधिकार कार्यकर्ता

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT