shivsena leader dr neelam gorhe mother Latika Gorhe passed away in pune  
पुणे

Neelam Gorhe News : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

सकाळ डिजिटल टीम

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या तसेच स्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांच्या मातोश्री श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे (वय ८७) यांचे आज सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या मॉडेल कॉलनी, पुणे येथील निवास स्थानी गेली ४२ वर्षे त्यांचे वास्तव्य होते.

अंत्यदर्शन वेळ दुपारी २.३० ते ४.३० सिल्हररॅाक्स हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी, पुणे येथे घेता येणार आहे. तर अंत्यसंस्कार हे ५ वा वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे होणार आहेत.

लतिका गोऱ्हे यांचा जन्म २ ऑगस्ट १९३५ रोजी पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे देशपांडे कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीपाद आप्पाजी देशपांडे आणि आई अनुसया देशपांडे यांच्या सुसंस्कृत आणि मोठ्या कुटुंबात त्यांचे संस्कारपूर्ण शिक्षण झाले. या कुटुंबीयांचे विशाळगड संस्थानशी जवळचे संबंध होते.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह प्रख्यात संशोधक व पशूवैद्यकीय तज्ञ डॉ. दिवाकर गोऱ्हे यांच्याशी झाला. विवाहानंतर लतिकाताईंनी पदवीचे बी .ए चे शिक्षण पूर्ण केले.विवाहानंतर त्यांचे वास्तव्य काही काळ बडोदा, मुंबई आणि त्या नंतर पुणे येथे ४२ वर्षे होते. साहित्याची त्यांना विशेष आवड होती. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे प्रकट वाचन त्यांनी केले होते.

अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, भारत अशा विविध देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. अखिल भारतीय महिला परिषदेच्या जळगाव व भारततातील महिला परिषदातही त्या सहभागी झाल्या होत्या. केदारनाथ पासुन ते कन्याकुमारी पर्यंतच्या विविध तीर्थ क्षेत्राना त्यांनी भेटी दिल्या होत्या. स्त्री आधार केंद्राला ३जानेवारी २३रोजी ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात त्यांनी जाहीर भाषण देखील केले होते.

नीलम गोऱ्हे शिवसेनेतील माझा २५ वर्षे या पुस्तक प्रकाशनासाठी २०१८ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धाव ठाकरे याच्या हस्ते शिवसेना भवनातील कार्यक्रमात त्या व्यासपीठावर ऊपस्थित होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सौ. रशमीवहिनी ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगला परिचय होता.

त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन सुविद्य कन्या विधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि औषधशास्त्र विभागात आशिया विभागात काम केलेल्या स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी आहेत. तसेच नातवंडे मुक्ता व हिमाद्री, सत्यजित व सतलज, रश्मी व नीरज, रोशनी व संबीत, असा मोठा परिवार आहे.

डॉ. दिवाकर गोऱ्हे यांच्यासोबत भारतीय अॅग्रो ईंडस्स्ट्रीज फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मणीभाई देसाई आणि इतर पदाधिकारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. क्रांतिकारी महिला संघटना व स्त्री आधार केंद्र या दोन्ही संस्थांशी त्यांचे मातृत्वाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते.

शिवाजीनगर महिला मंडळ, पुणे शहर महिला मंडळ, पंढरपूर महिला मंडळ, अन्नपूर्णा महिला मंडळ अशा विविध संस्थांवर त्यांचे कार्य राहिले आहे. काही संस्थांमध्ये उपाध्यक्ष व पदाधिकारी म्हणुन तीन दशके त्यांनी काम पाहिले आहे. लतिका गोऱ्हे यांना विधान भवनातील विविध अधिकारी, कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT