पुणे

ज्यांचा मुख्यमंत्री, त्याचेच सरकार - संजय राऊत

उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करतील

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालु असून, भविष्यात ते देशाचे नेतृत्व करतील. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले, तरी ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्याचेच सरकार आणि ते ठाकरे सरकार आहे. तीन वर्षे अजून बाकी आहेत. आपण जे गमावले, ते कमवा,’’ असे मत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. आळेफाटा (ता. जुन्नर) येथे जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी राऊत बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, ‘‘जुन्नरच्या शिवसैनिकांचे महाराष्ट्रात वेगळे मार्केट आहे, ते कमी होत नाही. राज्यात ५५ ठिकाणी भगवा फडकला, पण जुन्नरला फडकायला नाही, ती खंत आम्हाला आहे. शिवसेना हे एक मंदिर आहे. डोक्यात राग घालून जायचे आणि परत यायचे, असे करू नका. आपले एकच कुटुंब आहे. जो शिवसेनेतून गेला, तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो. जी बोचकी बाहेर गेली, ती परत आली तरी परत घ्यायची नाहीत.’’

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, ‘राज्यात जरी महाआघाडी असली, तरी येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार आहे. गेल्या दोन वर्षांत दहा ते बारा कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात विवीध कामांसाठी दिलेला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. वेळोवेळी कायदा आणि न्याय विभागाला सूचना देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी प्रयत्न करत आहोत.’’

माजी आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्यात बिबट सफारी केंद्र व दाऱ्या घाटाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. आढळराव पाटील यांचे उत्तम काम असूनदेखील एका अभिनेत्यासमोर एक उत्तम नेत्याला पराभवाला जावे लागले. आपल्या भांडणाने समोरच्यांचा फायदा होतो. जी माणसे समाजात वावरत नाही, ज्यांचे मोबाईल चोवीस तास बंद असतात, ते पुण्या-मुंबईला जाऊन राहतात आणि फिरायला जुन्नर तालुक्यात येतात. अशा लोकप्रतिनिधींना घरचा रस्ता दाखवा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Snakebite Antivenom: सर्पदंशावरील जीवनरक्षक लस निर्मितीसाठी डॉ. श्याम ढवण यांना उद्योगरत्न पुरस्कार

Junnar Crime : कुसुरमध्ये वडज धरण परिसरात शेती पंपाच्या केबल चोरीचा प्रयत्न फसला; तीन चोरटे नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात

Porsche Car Accident : जामीनाच्या अटींचा भंग झाला असून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता

खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानात; विदर्भातून फुंकणार रणशिंग; आदित्य ठाकरे, संजय राऊतही सोबत...

SCROLL FOR NEXT