पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर पुण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. युवासेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांनी पुण्यातील नळस्टॉप चौकात फ्लेक्स लावले आहे.
(Pune Shivsena Banner Latest Updates)
"चिन्ह गोठवले पण रक्त पेटवले" असा आशय असलेले बॅनर रस्त्यावर लावण्यात आला आहे. आमचे चिन्ह "उद्धव बाळासाहेब ठाकरे", "जय महाराष्ट्र" असाही उल्लेख फ्लेक्सवर करण्यात आला आहे. कर्वे रोडवरील नळ स्टॉप येथे हा फ्लेक्स लावण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नावही कोणत्याच गटाला वापरण्यात येणार नसल्याचं आयोगाने सांगितलं आहे. त्यानंतर आयोगाच्या निर्णयाला शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यामुळे हा वाद पुन्हा न्यायालयात जाणार आहे. तर सेनेकडून नव्या चिन्हाची यादी पाठवण्यात आली आहे.
शिवसेनेकडून उगवता सुर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन चिन्ह पाठवण्यात आले आहेत. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांची यादी पाठवण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा असे तीन चिन्ह दाखल करण्यात आली आहेत. ठाकरे गटाने दाखल केलेल्या चिन्हावर शिंदे गटाने दावा केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोणत्या गटाला कोणते चिन्ह मिळणार हे पाहणे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक तोंडावर आली असून त्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडी या निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. तर आज दुपारपर्यंत चिन्हे पाठवण्याची मुदत दोन्ही गटाला देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.