Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
पुणे

पुणे महापालिकेच्या निम्म्या जागा शिवसेना लढविणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेत (Pune Municipal) १६४ जागा असून, शिवसेनेने (Shivsena) एकीकडे स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी (Preparation) सुरू केली असली तरी दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांशी युती झाल्यास ८० जागांवर शिवसेनेचे उमेदवार (Candidate) निवडणूक लढवतील, असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (Shivsena will Contest Half of Pune Municipal Corporation Seats Politics Sanjay Raut)

पुण्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी शिवसेना भवन येथे चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्याचा आपल्याला उपयोग करून घेत निवडणूक जिंकता आल्या पाहिजेत, त्यादृष्टीने तयारी करा, असे बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले, असे राऊत यांनी नमूद केले. पुण्यातील पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, स्वतंत्र निवडणूक लढवणे किंवा महाविकास आघाडीतील पक्षांशी युती करण्याचे आमच्यासमोर दोन पर्याय आहेत. युती झाली तर शिवसेना किमान ८० जागांवर निवडणूक लढवेल. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर येथे कायम शिवसेनेचा भगवा फडकत आला आहे, तो कायम राहील पण यंदा पुण्यात किंग झालो नाही तर किंगमेकर नक्की होऊ.’’

पुण्यात भाजपची संघटना मजबूत नसतानाही लाटेमुळे महापालिकेत भाजपची सत्ता आली. अशीच सत्ता शिवसेनेची येऊ शकते. पण निवडणुकीच्यादृष्टीने संघटनात्मक बांधणीवर लक्ष दिले जाईल, असे राऊत यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे स्पष्ट केले असले तरी काँग्रेसने हा प्रयोग करावा. केंद्रातदेखील स्वबळावर सत्ता येणार असेल तर शुभेच्छा आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत खेड प्रकरणामुळे कटुता

खेडच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली होती, तरीही शिवसेनेचे सदस्य फोडून आमच्यावर अन्याय केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असताना खेडच्या प्रकरणामुळे कटुता निर्माण झाली आहे. स्थानिक राजकारण कुठपर्यंत न्यायचे हे ठरवले पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. शहर प्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यावेळी उपस्थित होते. राऊत म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत. शरद पवार यांच्यावर टीका करणे योग्य नाही. पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय बातम्या होत नाहीत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT