Shivshahi bus collapses in the valley at Katraj Ghat
Shivshahi bus collapses in the valley at Katraj Ghat  
पुणे

Video : असा झाला शिवशाहीचा अपघात: 28 प्रवासी जखमी, दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

खेड-शिवापूर(पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटून शिवशाही बस कात्रज घाटात शिंदेवाडी (ता.भोर) गावच्या हद्दीत सुमारे पंचवीस फुट खोल दरीत उलटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 28 प्रवासी जखमी झाल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली.

मोठी बातमी : कात्रज घाटात दरीत कोसळली शिवशाही बस; एका प्रवाशाचा मृत्यू 

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक शिवशाही बस स्वारगेटवरून सांगलीला निघाली होती. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही बस कात्रज बोगदा ओलांडून शिंदेवाडीच्या हद्दीत आली. यावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस येथील सुमारे पंचवीस फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात ही बस दरीत उलटली. त्यात अनेक प्रवासी अडकले होते.



अपघात झाल्याबरोबर स्थानिक नागरीक घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी ताबडतोब जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एकुण 28 प्रवासी जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली. राजगड पोलिस, पुणे शहर पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT