ba.jpg 
पुणे

बाणेर-बालेवाडी परिसरातील दुकानदारांचे 'हे' काय सुरू आहे...

शीतल बर्गे

बालेवाडी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून 
पुणे परिसरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर पहिले पाच दिवस कडक लॉकडाउन व नंतर ते  काही  अंशी  शिथील करत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश महापालिकेकडून दिले असून, बाणेर-बालेवाडी येथे मात्र या आदेशाला काही दुकानदारांकडून केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. दुपारी बारानंतरही ही दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांकडून सूचना देत ही दुकानं बंद करून घेण्यात आली.

पुणे शहर परिसरात कोरोना चे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून दहा दिवसांच्या लॉकडाउनच्या निर्णय घेण्यात आला. यातील पहिल्या पाच दिवसांच्या लॉक डाऊन मध्ये कडक अंमलबजावणीची  मुदत शनिवारी संपली, तर रविवारी नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडतील आणि गर्दी करतील यासाठी खरेदीला वेळ मिळावा म्हणून सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंतचा वेळ वाढवून देण्यात आला. तर सोमवारी मात्र सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले.

नागरिकांनी नियमांचे व निकषांचे पालन करावे असे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले होते. पण आज बाणेर- बालेवाडी भागातील काही व्यापाऱ्यांनी दुपारी बारानंतरही दुकाने बंद करणे अपेक्षित होते, पण तसे न करता या भागातील  दुकानदारांकडून शासकीय नियमावलीला कराराची टोपली दाखवत दुकाने सुरूच ठेवली.  हे लक्षात आल्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांकडून त्या त्या ठिकाणी जाऊन ती दुकाने त्वरित बंद करून घेण्यात आली.

आज दुकानांसाठी ची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 अशी होती, पण या भागातील काही दुकानदारांनी दुकाने सुरूच ठेवली, हे लक्षात येताच या  दुकानदारांना  त्वरित दुकाने बंद करण्याचे  सांगून दुकाने बंद करून घेतली.-दत्ता गेंगजे, पोलिस नाईक,  चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन

Edited by : sagar shelar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT