kothrud.jpg 
पुणे

कोथरूडमधले व्यावसायिक म्हणताहेत, दुकान उघडले पण...

सकाळवृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्र वगळून पुणे शहरातील इतर भागात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज कोथरुडमधील सुतार दवाखाना, गुजराथ कॉलनी, पौडरस्ता आदी भागात नागरिकांची वर्दळ असल्याचे चित्र होते. तरीसुध्दा दुकानदारांच्या अपेक्षे प्रमाणे ग्राहक येत नसल्याचे दिसले.

पौडरस्त्यावरील वनाज येथे असलेल्या फोटो फ्लॅश कलर लॅब आणि स्टुडीओचे संचालक संतोष कडू म्हणाले की, गेले दोन महिने कोरोनामुळे व्यवसाय बंद आहे. दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, वीज बील असा एक ना अनेक खर्चाचा भार आहे. आज आम्ही फोटोचे दुकान उघडले पण म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. कुटूंबातील मयत व्यक्तींचे फोटो मोठे करणे व पासपोर्ट साईजचे फोटो काढणे यासाठी एखादे दुसरे ग्राहक आले. आता पुन्हा अशा पध्दतीने दुकाने बंद करण्याची वेळ येवू नये हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे.

कोथरुडमधील पिटर इंग्लड शोरुमचे संचालक तिडके यांनी सांगितले की, महानगरपालिकेने परवानगी दिली असली तरी कंपनीने आम्हाला काही काळ वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. सरकारचे सर्व नियम व सुचनांचे पालन करुन लवकरच व्यवसाय सुरु करण्यात येईल.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सुयोग केश कर्तनालयचे नितीन चव्हाण म्हणाले की, आमच्या विवेकानंद चौकात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची रोज मोठी गर्दी असते. पण गेली दोन महिने आमचे दुकान बंद आहे. ग्राहक येतात, फोन करतात परंतु आम्ही नम्रपणे नकार देतो. आमचे हातावर पोट आहे. कर्जाचा लोड झालाय. पण सांगता कोणाला. कोथरुड ग्रीन झोन मध्ये आहे. दुकान उघडायला हरकत नाही असे काहींनी आम्हाला सांगितले परंतु आपले पुणे शहर रेड झोन मध्ये असल्यावर आमचे दुकान कसे उघडता येईल. आमच्या मनात सरकारी आदेशाबद्दल संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT